राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नुकताच ७५वा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्ताने आज एबीपी माझा वृत्त वाहिनीच्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय कारकीर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, दरम्यान, याआधी कोणत्या वाढदिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघितली का? असा प्रश्न विचारताच त्यांनी १९६० साली शिवाजी पार्कवर झालेल्या वाढदिवसाची आठवण सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाने का हुलकावणी दिली? सांगितलं नेमकं कारण; काँग्रेसनेही दिली होती ऑफर, पण…

काय म्हणाले छगन भुजबळ?

“१९६० मध्ये माझा जो वाढदिवस झाला. तो शिवाजी पार्कवर झाला. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांपासून ते देशभरातील नेतेही त्यावेळी उपस्थित होते. त्या दिवशी शिवाजी पार्क आणि त्यांच्या बाहेरचे रस्ते लोकांनी फुलून गेले होते. देशभरातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. लोकांचे हे प्रेम बघून भारावून गेलो होते. शिवाजी पार्कवर एवढी मोठी वाढदिवसाची सभा कदाचित माझीच झाली असेल”, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.

हेही वाचा – मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, पण मुंबई महापौरपदाच्या कारकिर्दीवर विशेष प्रेम; छगन भुजबळांनी सांगितलं कारण, म्हणाले…

“गेल्या ७५ वर्षात अनेक चांगल्या गोष्टी सुदैवाने माझ्या हातून घडल्या. १९८५ साली मी महापौर झालो त्याची आठवण मला सातत्याने येते. त्यावेळी मी अतिशय लोकप्रिय असा महापौर होतो. मुंबईसाठी अनेक कामे आम्ही केली. बॉम्बेचं मुंबई असं नामांतर असेल किंवा मराठीचे आंदोलन असेल, अशी बरीच आंदोनलं आम्ही या मुंबईत केली”, असेही ते म्हणाले.