मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर टीका करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या, त्यांना इतिहास ठाऊक नाही असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची चिंता करु नका, खातेवाटप लवकरच होईल असंही भुजबळ यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही एक महिन्याने खाते वाटप झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले छगन भुजबळ?

“रोहित पवारला सांगा, मी जानेवारी, फेब्रुवारी १९८५ मध्ये आमदार झालो. एप्रिल १९८५ ला मुंबईचा मुंबईचा महापौर झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मोठं केलं असल्या फालतू गोष्टी करु नका. इतिहास जाणून घ्या. छगन भुजबळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून शरद पवारांकडे आला नव्हता. मी शिवसेनेचा नेता होतो आणि आमदार होतो. आज किती दिवस हे चाललं आहे. अजित पवार तुम्हाला भेटत आहेत. अजित पवार आणि तुमचं पवार घराणं ठरवून शरद पवारांचा राजीनामा द्यायचा हे करता. तेव्हा आम्हाला सांगितलं होतं का? जास्त मी त्याला किंमत देत नाही. ते जेवढं पुढे येतील तेवढा मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देईन.” असं म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.

हे पण वाचा- राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास

रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिकच्या अनेक आठवणी सांगतात. शरद पवार येवल्यात आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील असं म्हणत रोहित पवार यांनी भुजबळांचं नाव न घेता टीका केली होती. मात्र या टीकेवरुन चिडलेल्या छगन भुजबळ यांनी थेट रोहित पवारांचं जन्म कधी झाला तेच वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांना चार-ते पाच लोक व्हिलन करत आहेत. पक्ष फुटायचं खापरही अजित पवारांवरही काही लोक फोडत आहेत. नाशिकमध्ये मी बॅनर पाहिला त्यावर अजित पवारांचा फोटोही नव्हता असंही रोहित पवार म्हणाले होते. त्यावरुनच भुजबळांनी आता रोहित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना सुनावलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal vs rohit pawar bhujbal gave strong answer to him on ncp split scj