मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने त्यांची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की, लाखो मराठा बांधवांना घेऊन आम्ही २० जानेवारी रोजी मुंबईत चक्काजाम आंदोलन करू, तसेच मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदल उपोषणाला बसेन. दुसऱ्या बाजूला, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि छगन भुजबळ सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. अशातच भुजबळ यांनी शनिवारी (१३ जानेवरी) बीड येथे ओबीसी एल्गार मेळावा घेऊन ओबीसींबाबत आक्रमक भूमिका मांडली.
“बेटा छोड दे हथियारों की बात, वरना सब…”, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना इशारा
छगन भुजबळ म्हणाले, ते (मनोज जरांगे) म्हणतात ओबीसीतूनच आरक्षण घेणार. त्यांची अशी भूमिका असेल तर मला त्यांना सांगायचं आहे की, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही.
Written by अक्षय चोरगे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-01-2024 at 00:13 IST
TOPICSओबीसी आरक्षणOBC Reservationछगन भुजबळChhagan BhujbalबीडBeedमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservation
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal warns manoj jarange patil dont talk about weapons maratha reservation asc