Chhagan Bhujbal NCP Party Change: अजित पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे. पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या मते ७६ वर्षीय छगन भुजबळ हे नाराज असून अनेक पर्यायांचा विचार करत आहेत. दोन पर्यायांपैकी एक पर्याय ते स्वीकारतील असं दिसतं आहे. त्यातला पहिला पर्याय स्वतःचा पक्ष स्थापन करणार किंवा दुसरा पर्याय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार. असं घडलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक वर्तुळ पूर्ण होईल. कारण साधारण तीन दशकांपूर्वी छगन भुजबळ यांनी पहिलं बंड शिवसेनेतच केलं होतं. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते.

लोकसभेची जागा नाकारल्याने नाराजी

छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांचं हे म्हणणं आहे की नाशिकमधून लोकभेचं तिकिट नाकारल्याने छगन भुजबळ नाराज होतेच. मात्र आपल्याला राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी अपेक्षा त्यांना होती. ती त्यांनी बोलूनही दाखवली होती. पण सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर छगन भुजबळ यांची नाराजी आणखी वाढली आहे. समता परिषदेची बैठक सोमवारी पार पडली त्या बैठकीतही छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे असं समजतं आहे.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”

भुजबळांकडे बरेच पर्याय

छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी हे सांगितलं आहे की छगन भुजबळांकडे अनेक पर्याय आहेत. त्यांचा सारासार विचार करुन ते निर्णय घेतील. समता परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पण अजित पवार गटातून छगन भुजबळ बाहेर पडणार हे निश्चित आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

आणखी एका नेत्याने काय सांगितलं आहे?

आणखी एका नेत्याने सांगितलं की ओबीसी कोट्याबाबत छगन भुजबळ यांची भूमिका ठाम आहे. तसंच लोकसभेचे निकाल आले आहेत त्यानंतर छगन भुजबळांना त्यांचं भवितव्य अंधारात दिसतं आहे. महायुतीने त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ असं म्हटलं होतं. मात्र त्यांचं नावच जाहीर केलं नाही. शेवटी छगन भुजबळ यांनी माघार घेतली. त्यानंतर त्यांनी अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाला वेठीस धरलं नाही. महा विकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांना त्यांनी छुपा पाठिंबा दिला हे आता जवळपास सगळ्यांना माहीत आहे. एवढंच नाही तर जे मताधिक्य शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळालं त्याबद्दल भुजबळ यांनी दोघांचं उघड कौतुकही केलं होतं. असंही या नेत्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितलं.

हे पण वाचा- जातनिहाय जनगणनेसाठी लवकरच पंतप्रधानांची भेट; ओबीसींच्या प्रश्नावर छगन भुजबळ आक्रमक

वर्षभरापासून महायुतीच्या विरोधात भूमिका

छगन भुजबळ हे साधारण मागच्या वर्षभरापासून महायुतीच्या धोरणाविरोधात भूमिका घेत आहेत. ओबीसी आंदोलनापूर्वी त्यांनी दिलेला राजीनामा असो किंवा त्यांनी पुढे मांडलेल्या भूमिका असोत या सगळ्या महायुतील्या साजेशा नव्हत्या. ओबीसींसाठी आवाज उठवणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. त्यामुळे ते वेगळा निर्णय घेतील आणि लवकरच ते हा निर्णय घेतील असंही त्यांच्या जवळच्या नेत्याने सांगितलं.

जरांगे भुजबळ संघर्ष

मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला त्यावेळी एकटे छगन भुजबळ होते ज्यांनी याविरोधात आवाज उठवला. ओबीसींचं आरक्षण महत्त्वाचं आहे ही भूमिका त्यांनी मांडली. मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांसह त्यांचे या मुद्द्यावरुन मतभेदही झाले होते. १६ नोव्हेंबर २०२३ ला त्यांनी राजीनामा दिला होता. जी बाब त्यांनी स्वतःच माध्यमांना सांगितली होती. छगन भुजबळ यांना जेव्हा तु्म्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार आहात का? हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी नकार दिला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यांना या चर्चांबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, मी छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार आहेत हे गेल्या काही दिवसांपासून ऐकते आहे. आता ते काय निर्णय घेतात ते पाहता येईल. मात्र छगन भुजबळ जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक केली होती. या सगळ्या गोष्टी विसरुन उद्धव ठाकरे त्यांचं स्वागत करु शकतात. असं अंजली दमानियांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितलं आहे.
याबाबत विचारलं असता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर हे सांगितलं आहे की, २०१९ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा शिवसेनेशी कट्टर वैर असणारे भुजबळ अशीच त्यांची प्रतिमा होती. तरीही उद्धव ठाकरे त्यांच्या बोलले. आम्हाला ती बाब तेव्हाही आवडली नव्हती. तसंच आत्ताही जर भुजबळ शिवसेनेत आले तर अनेक जुन्या नेत्यांना ही बाब पटणार नाही.