राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. पवारांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. शरद पवारांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत, तसेच तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काहींना वाटतंय त्यांनी दबावातून हा निर्णय घेतला आहे तर काहीजण या निर्णयाला मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे हे पद दिलं जाऊ शकतं अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर काहींच्या मते सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होतील आणि अजित पवारांकडे राज्यातला पक्षाचा कारभार सोपवला जाऊ शकतो. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारले असता, भुजबळ म्हणाले, साधारणपणे पक्षाचा राज्यातल्या कारभार अजितदादा बघतात आणि दिल्लीतलं पक्षाचं काम संसदेचं काम सुप्रियाताई योग्य पद्धतीने सांभाळतात. सुप्रिया ताईंना प्रश्नांची जाण आहे. त्यांना अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. भुजबळ टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sharad pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महायुतीच्या नेत्यांची रीघ
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Mahayuti Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Dispute in Mahayuti: ‘चोराच्या उलट्या बोंबा’, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया
Shinde group displeasure with NCP over Ladaki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेतील ‘मुख्यमंत्री’ शब्द गायब; राष्ट्रवादी काँग्रेसवर शिंदे गटाची नाराजी
Why did prakash ambedkar refrain from commenting on the BJP-Sangh coordinators question
भाजप-संघ समन्वयकाच्या प्रश्नावर आंबेडकरांनी भाष्य का टाळले?
President rule, Balasaheb Thorat,
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी

हे ही वाचा >> सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष होणार? जितेंद्र आव्हाड स्पष्टच म्हणाले…

भुजबळ म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा देणं हा सर्वांसाठीच मोठा धक्का आहे. आम्ही सर्वजण शरद पवारांवर प्रेम करणारे लोक आहोत. ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नांची जाण असल्याने आम्ही शरद पवारांचा हात धरला. शिवसेनेतून आलो आणि त्यानंतर राजकारणात त्यांचा हात धरून पुढची वाटचाल सुरू केली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव मिळालं. देशातील प्रश्नांची जाण असणारे ते कदाचित एकमेव नेते आहेत. त्यामुळे त्यांनी अचानक असा निर्णय घेणं धक्कादायक होतं.