छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी रामनवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागात दोन गटांमध्ये वाद झाला आहे. त्या वादाचं रूपांतर नंतर दगडफेक आणि जाळपोळीत झालं. हा राडा का झाला हे जाणून घेण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली होती. त्या SIT चा अहवाल आला आहे. तीन अफवांमुळे ही जाळपोळ आणि राडा झाला ही बाब समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या राडा प्रकरणात माहिती समोर आली आहे. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांना फक्त या अफवाच कारण आहेत असंही समोर आलं आहे. सुरूवातीला दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. पोलिसांनी या वादात हस्तक्षेप करत हा वाद मिटवला होता. मात्र त्यानंतर काही लोकांनी सोशल मीडियावरुन अफवा पसरवल्या आणि त्यामुळे मोठा जमाव किराडपुरा या ठिकाणी जमा झाला. “एका गटाच्या तरुणांना नाहक मारण्यात आले आहे, मारेकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात लपवून ठेवले आहे आणि शहागंजमध्ये दंगल उसळली आहे,” यासह इतर अफवा पसरल्यानेच जमाव जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अफवा पसरवणाऱ्या लोकांचा शोध पोलीस घेत आहेत.

रामनवमीच्या आदल्या दिवशी झालेल्या राड्याला २५ दिवस पूर्ण

रामनवमीच्या आदल्या दिवशी झालेल्या राड्याला २५ दिवस पूर्ण झाले आहेत. या घटनेला २५ दिवस उलटले आहेत. पोलिसांकडून आता फरार आरोपींचा शोध घेतला जातो आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणात आत्तापर्यंत ७९ हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे आणि अटकही केली आहे. तसंच इतर फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. घटनास्थळी आढळलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलीस आणि विशेष तपास पथक या प्रकरणी इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. एबीपी माझाने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. या जमावाने त्या रात्री पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. शहरातील किराडपुरा भागात ही दंगल झाली होती. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये आधी बाचाबाची झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली. पुढे जाळपोळ आणि हाणामारी सुरूच होती. ज्यानंतर या प्रकरणावरून राजकारणही तापलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chharapati sambhaji nagar rumors cause to dispute said sit report scj
Show comments