Gautami Patil Lavani Show: सोशल मीडियामुळे अत्यंत प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अपघात झाला आहे. छत्रपती संभाजी नगरमधल्या वैजापूर या ठिकाणी गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम सुरु झाला आणि अचानक एक अनपेक्षित घटना घडली. गौतमी पाटील ही कायम चर्चेत असते. आता या घटनेमुळे गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली आहे.

नेमकी काय घडली ही घटना?

छत्रपती संभाजी नगरमधल्या वैजापूर या ठिकाणी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील येणार म्हटल्यावर कार्यक्रमाला गर्दी होतेच. तशीच त्या या कार्यक्रमालाही झाली. गौतमीचा नाच पाहण्यासाठी काही चाहते एका पत्र्याच्या दुकानाच्या शेडवर बसले होते. नाच सुरु झाला. राती अर्ध्या राती हे गाणं सुरु होतं. तेवढ्यात पत्र्याची शेड कोसळली. या संदर्भातला व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या घटनेत काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र नेमके किती लोक जखमी झाले ते समजू शकलेलं नाही.

water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Why Hindu gods dance
हिंदू देवता नृत्य करतात तर इतर धर्मातील देव नृत्य करत नाहीत असे का?। देवदत्त पट्टनायक यांच्याबरोबर कला आणि संस्कृती
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Marathi Actress Pooja Sawant Dance On radha song with Cousins watch video
Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर

सबसे कातील गौतमी पाटील या नावाने गौतमी सोशल मीडियावर फेमस आहे. एवढंच काय तर तिच्या डान्सचा कार्यक्रम असला की तिथे गर्दी होतेच. मात्र अशा काही घटना घडतात ज्यामुळे गौतमी पाटीलची चर्चा होते. आता वैजापूरमधल्या महालगाव या ठिकाणी जी घटना घडली त्यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महालगाव येथे गौतमी पाटील हिचा बस स्थानकाजवळ कार्यक्रम सुरू होता. गौतमी पाटीलला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. जागा मिळेल तिथे लोक बसले होते. काही लोक पत्र्याच्या शेडवरही बसले होते. मात्र या लोकांच्या वजनाचा भार पत्र्याच्या शेडला जास्त झाला आणि शेड कोसळली. त्यामुळे भर कार्यक्रमात गौतमी पाटील नाच करत असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी लोकांना पांगवलं असंही सांगितलं जातं आहे.

Story img Loader