छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बुधवारी सकाळी एका कापडाच्या दुकानाला आग लागली. या आगीत दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातले सात जण या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. छत्रपती संभाजी नगरमधल्या छावणी भागात ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगरमधल्या छावणी या ठिकाणी आग लागली. या घटनेत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. आग लागलेल्या इमारतीत एकूण १६ जण राहात होते. पहिल्या मजल्यावर सात, दुसऱ्या मजल्यावर सात आणि तिसऱ्या मजल्यावर दोन जण राहात होते.

छावणी भागातल्या दाणा बाजार गल्लीत जैन मंदिराच्या बाजूला दुकान होतं. या दुकानाला जी आग लागली त्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

मृतांची नावं

हमीदा बेगम – ५० वर्षे
शेख सोहेल- ३५ वर्षे
वसीम शेख- ३० वर्षे
तन्वीर वसीम -२३ वर्षे
रेश्मा शेख -२२ वर्षे
आसिम वसीम शेख- ३ वर्षे
परी वसीम शेख- २ वर्षे

अशी या घटनेतील सात मृतांची नावं आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यांनी कसोशीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. या घटनेत अग्निशमन दलाचा एक जवानही जखमी झाला. किंग स्टाईल टेलर्स या कापड दुकाना आग लागली. या आगीचे लोट वरपर्यंत पसरले आणि या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला.