अलिबाग– सांगली येथील एक गृहस्थ महात्मा गांधी, ज्योतीबा फुले आणि तिरंगा झेंड्याबद्दल काही बोलतो, हा मोठा गुन्हा नाही का असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतात आमचा त्यां गृहस्थांचा संबध नाही. ते वेगळ्या संघटनेचे आहेत. कोणाला फसवत आहात. लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, आणि कोणी जर बेजबाबदारपणे वागत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असं…” मोदी-शाह यांच्या पुणे दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

ते पाली येथे शेकाप वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी शेकाप सरचिटणी आमदार जयंत पाटील आणि पक्षाचे वरिष्ट नेते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. राज्याचे राजकारण गोंधळात टाकणारे आहे. काय चालले आहे हेच कळेनासे झाले आहे. शिवसेना सत्तेत आहे. विरोधातही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे आणि विरोधातही आहे. भाजप मात्र बाजूला राहून मजा बघत आहे. काही गडबड आहे ही गडबड मला समजून घ्यायची आहे. मी राजकारणी नाही, पण राजकारण्यात येण्याचा प्रयत्न करतो आहे. सुसंस्कृत राजकारण करण्याचा माझा प्रयत्न आहे.

हेही वाचा >>> तुळजाभवानी शारदीय नवरात्रौत्सव धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर, १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, २४ ऑक्टोबरला सिमोल्लंघन

शेकाप हा कुणा समोर वाकणारा पक्ष नाही, वेळ पडली तर आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदावरही पाणी सोडण्याची या पक्षाची तयारी असते, ७५ वर्षांचा विचार त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून मी त्यांच्या सोबत आहे असेही ते यावेळी म्हणाले. आमची उद्दीष्ट वेगळी असली तर विचार एक आहे. या विचारासाठी आपण सोबत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगीतले. वरळी येथील दुध डेअरीसाठी २०० कोटी दिले जाणार असल्याचे मी ऐकले. दुध डेअरीसाठी निधी द्याच पण राज्याचा इतिहास असलेल्या गडकोट किल्ल्यांसाठी निधी कधी देणार असा सवाल त्यांनी यावेळी केला.  रायगड किल्ल्याचे संवर्धन माझ्यामुळे सुरु झाले. सरकारनी निधी दिला. त्याच प्रमाणे ५० किल्ले द्या मी संवर्धन करून दाखवतो. याची सुरवात सुधागड किल्ल्यापासून करू या पुर्नउच्चार त्यांनी यावेळी बोलतांना केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati sambhaji raje demand action against sambhaji bhide for offensive statement zws