Chhatrapati Sambhajiraje on Manoj Jarange : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. काल (३ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर, रात्रभर बैठक झाली, मित्रपक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी दिली नाही. त्यामुळे एकाच जातीच्या आधारावर निवडणूक लढता येणार नाही, असं सांगून मनोज जरांगेंनी आज (४ नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. स्वराज्या पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं नेतृत्त्व मराठा आंदोलक नेते म्हणून पुढे आलं. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून त्यांनी राज्यात आंदोलन आणि उपोषणे करून मराठा समाजाच्या व्यथा सरकारपुढे मांडल्या. यामुळे मनोज जरांगेंना मोठं पाठबळ मिळालं. मराठा आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला बसला असल्याचंही राजकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीत उभं राहायचं ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी उमेदवारांना अर्ज भरण्यासही सांगितले. परंतु, आता त्यांनाच उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणूक आणि उमेदवार निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेत स्वराज्या पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे त्यांच्याबरोबर होते. त्यांच्यात नव्या आघाडीची चर्चा सुरू होती. परंतु, आता जरांगे निवडणूक लढणार नसल्याने छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरेल.

Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >> Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

माघार शब्द चुकीचा

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मनोज जरांगे यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव आलेला नाही. त्यांनी नेहमीच परखड भूमिका मांडलेली आहे. माघार हा शब्द चुकीचा आहे. समाजाच्या दृष्टीकोनातून समाजाला काय गरजेचं आहे, समाजाला वेठीस धरून काय करू नये, अशा मताचे ते असून यामागे त्यांचा हाच दृष्टीकोन असेल. पण मी परत एकदा सांगेन की मी आत्ताच इथे आलोय, तुमची एवढी गर्दी पाहून मला वाटलं की काहीतरी गडबड झालीय.”

“मनोज जरांगेंची भूमिका पूर्वीपासून हीच होती की आपले उमेदवार विधानसभेत पाठवावेत. विधानसभेच्या पटलावर आपला माणूस गेल्याशिवाय आपली भूमिक मांडू शकत नाही. ही माझीसुद्धा भूमिका होती. त्यामुळे त्यांनी आता जो निर्णय घेतलाय त्यामागे अनेक कारणं असतील. ही कारणं समाजहिताची असतील. वर्षभर आंदोलन केलं, त्यामुळे आंदोलनाला ग्रीप मिळाली. एक आंदोलन दीड वर्षे टीकणं ही ऐतिहासिक बाब आहे”, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.