किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोरच पिंडदानाचा विधी सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या धक्कादायक प्रकाराने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या गंभीर प्रकाराची कसून चौकशी करून तेथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शनिवारी रायगड किल्ल्यावर शाक्त पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. त्यावेळी या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे राज्यभरातील कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठया संख्येने हजर होते. राजसदरेवरील राज्याभिषेकाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर तिथली परीस्थिती पाहून सारेच अवाक झाले.
रायगडावर पुस्तक पूजनावरून दोन गटांमध्ये वाद
त्या ठिकाणी काही लोक पिंडदानाचा विधी करत होते. पिठाचे गोळे, फुले व इतर साहित्य पाहून त्यांना हा पिंडदानाचा विधी असल्याची खात्री झाली. संभाजी ब्रिगेडचे कोकण विभागीय अध्यक्ष सुर्यकांत भोसले व तेथे आलेल्या अन्य शिवभक्तांनी हा प्रकार पाहिला आणि तिथं पिंडदान करणाऱ्या व्यक्तींना याचा जाब विचारला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्यानच्या काळात पाऊस आणि धुके यामुळे गोंधळ उडाला आणि हा कथित प्रकार करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. यासंदर्भात पोलीस आणि पुरातत्व खाते एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला आहे.
रायगडावर अस्थिविसर्जनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून चौघांना अटक!
या प्रकाराने शिवभक्त संतापले आहेत. यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे पूजन शिवसमाधी समोर करण्याचा कथित प्रकार समोर आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रायगडावर घडलेल्या घटनेसंदर्भात शिवप्रेमी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार आहेत. शिवसमाधीच्या ठिकाणी पोलिस संरक्षण आहे, २४ तास पोलीस तिथं तैनात असतात. पुरातत्व विभाग कार्यरत आहे, असे असताना महाराजांच्या समाधीसमोर पिंडदान विधी होत असेल तर ती लाजिरवाणी बाब असल्याची टीका शिवप्रेमी करत आहेत.
संभीजीराजे छत्रपतींचं पत्र
“शिवसमाधी आणि रायगड परिसरात पोलीस तैनात असतात. शिवाय पुरातत्व विभागाची देखरेख असते. पोलीस तैनात असूनही असा प्रकार घडतोच कसा? याचा अर्थ पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या संगनमताने असे प्रकार होतात असा घेता येईल. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याची शासनाने दखल घेतली पाहिजे. आणि संबंधित लोक तसेच पोलीस , पुरातत्व विभागाचे अधिकारी यांचरूावर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.