छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज ६ जून रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले आहे. शिवभक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण असून पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झालं असल्याचं पाहायला मिळत आहे.

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध नेते मंडळीही रायगडावर येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने योग्य ती तयारीही केली आहे.

हेही वाचा : ठाकरे गटाची मोदींवर जोरदार टीका, “नितीशकुमार आणि चंद्रबाबू नायडूंच्या कुबड्या घेऊन..”

किल्ले रायगडावर शिवभक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून काही स्वयंसेवक देखील मदतीसाठी असणार आहेत. तसेच आपत्कालीन उपचारांसाठी वैद्यकीय उपचार केंद्रही सुरु करण्यात आलेली आहेत. याबरोबरच पोलीस प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. किल्ले रायगडावर शिवभक्तांची गर्दी होण्याची शक्यता पाहता गाड्यांच्या पार्किगसह पिण्याच्या पाण्यासह योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

कोल्हापूरसह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात सोहळा पार पडत आहे. याचबरोबर महाराष्ट्रात विविध ठिकाणीही शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. तसेच राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच कोल्हापुरात देखील नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. कोल्हापूर येथील शिवराज्याभिषेक सोहळ्यात खासदार शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती सहभागी झाले आहेत.

Story img Loader