Chhatrapati Shivaji Maharaj’s 350th Coronation Ceremony at Raigad: स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहपरिवार उपस्थित आहेत. त्यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजेरी लावली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, राम शिंदे आदी नेतेही यावेळी उपस्थित होते.

रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आल्याचं दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आलं. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत.

राज्य सरकारकडून ३५० कोटींचा निधी

शिवराज्याभिषेकाचं हे ३५०वं वर्षं असून यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातच ३५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. “छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर अंगी स्फुरण चढणार नाही, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा आपण उत्साहात साजरा करत आहोत. महाराष्ट्र सरकारतर्फे शिवराज्याभिषेक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.विविध कार्यक्रमांसाठी ३५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे”, असं ते म्हणाले.

“पुण्याच्या आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान आपण उभारत आहोत. याचप्रमाणे मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी दृकश्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्यानं विकसित केली जाणार आहेत. या उद्यानांमध्ये छत्रपती शिवरायांची जीवनगाथा प्रदर्शित केली जाईल. शिवरायांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारलं जाणार आहे. शिवराज्याभिषेक दिन सदैव स्वराज्याची, सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा दिवस. या दिवसानिमित्त रायगडावर राज्य सरकारतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचं तर रायगडाच्या पायथ्याशी १ ते ७ जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे”, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडीओमध्ये दिली आहे.

“शिवछत्रपतींचा राज्याभिषेक महाराष्ट्रच नाही, देशच नाही तर अवघ्या जगासाठी आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होण्यासाठी इथे सगळे जमले आहेत. महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते इथे येत आहेत. आनंद वाटतोय. राज्य सरकारने यासाठी सर्व काळजी घेतली आहे. कुणाचीही अडचण होता कामा नये यासाठी सर्व नियोजन केलं आहे. तिथी आणि तारखेनुसार या सात दिवसांच्या कालखंडात हा सोहळा होतोय. त्यानिमित्ताने सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते राम शिंदे यांनी दिली.

Live Updates

Shivrajyabhishek Din: रायगडासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह!

11:04 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: भवानी तलवार आणि वाघनखं परत आणण्यासाठी प्रयत्न - एकनाथ शिंदे

लंडनमधली भवानी तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सुधीर मुनगंटीवार त्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामध्ये आपल्याला मदत करणार आहेत - एकनाथ शिंदे

10:54 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live:

शिवाजी महाराजांच्या न्यायप्रियतेनं अनेक पिढ्यांना प्रेरित केलं आहे. त्यांचं साहस, सामुद्रिक कौशल्य आणि शांतीपूर्ण राजनिती आजही आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहे. आपल्याला या गोष्टीचा गर्व आहे की जगाच्या अनेक देशात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची चर्चा होते आणि त्यावर संशोधन होतं. एक महिन्यापूर्वीच मॉरिशसमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली. त्यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षं पूर्ण होणं हीच एक प्रेरणादायी बाब आहे - नरेंद्र मोदी

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1664500485481693184

10:53 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live:

शिवाजी महाराजांनी भारताच्या सामुद्रिक सामर्थ्याला ओळखून ज्याप्रकारे नौसेनेचा विस्तार केला, आपलं व्यवस्थापन कौशल्य दाखवलं, ते आजही सगळ्यांना प्रेरित करतं. त्यांनी बनवलेले जलदुर्ग समुद्राच्या मध्यभागी वेगाने उठणाऱ्या लाटांच्या तडाख्यासमोरही आजही मोठ्या मानाने उभे आहेत. त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यापासून डोंगरांपर्यंत किल्ले बनवले आणि आपल्या राज्याचा विस्तार केला. त्या काळात त्यांनी पाणी व्यवस्थापनाशी संबंधित जी व्यवस्था उभी केली, ती अनेक तज्ज्ञांना आश्चर्यचकित करते. हे आपल्या सरकारचं सौभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन गेल्या वर्षी भारतानं गुलामगिरीच्या एका निशाणीपासून नौसेनेला मुक्त केलं. नौसेनेच्या ध्वजावरील इंग्रज शासनाची ओळख हटवून शिवाजी महाराजांची राजमुद्रा स्थापित करण्यात आली आहे. आता हाच ध्वज नव्या भारताची शान बनून समुद्रात डौलानं फडकतो आहे - नरेंद्र मोदी

10:49 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live:

शिवाजी महाराजांनी स्वराज्य, धर्म, संस्कृती यांना धक्का पोहोचवणाऱ्यांना इशारा दिला. यामुळे जनतेत दृढ आत्मविश्वास वाढला. कृषीविकास, महिला सबलीकरण, शासन-प्रशासनाची सामान्यांपर्यंतची पोहोच, त्यांचं काम, शासनप्रणाली, नीती या आजही तितक्याच लागू होऊ शकतात. शिवाजी महाराजांचे इतके पैलू आहेत, की कोणत्या ना कोणत्या रुपात त्यांचं जीवन आपल्याला प्रभावित करतं - नरेंद्र मोदी

10:46 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live:

इतिहासात अनेक असे राज्यकर्ते झाले, जे आपल्या सैन्यसामर्थ्यासाठी ओळखले जातात. पण त्यांची शासनव्यवस्था कमकुवत होती. काहींच्या बाबतीत हे उलट होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व अद्भुत होतं. त्यांनी स्वारज्याची स्थापना केली आणि सुराज्यही साकार केलं. ते त्यांच्या शौर्यासाठी आणि सुशासनासाठीही ओळखले जातात. लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या सैन्य नेतृत्वाची चुणूक दाखवली. दुसरीकडे राजा म्हणून लोककल्याणाच्या योजना लागू करून त्यांनी सुशासन दाखवलं. आक्रमकांपासून जनतेचं संरक्षण करतानाच राष्ट्रनिर्माणाच्या व्यापक धोरणाचाही त्यांनी परिचय दिला. म्हणून ते इतिहासातील इतर राज्यकर्त्यांपासून वेगळे ठरतात - नरेंद्र मोदी

10:41 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live:

३५० वर्षांपूर्वी छत्रपतींचा राज्याभिषेक होत असताना त्यात स्वराज्याची ललकारी होती. त्यांनी नेहमीच भारताचं ऐक्य आणि अखंडतेला प्राधान्य दिलं. एक भारत, श्रेष्ठ भारताच्या विचारात छत्रपतींच्या या विचाराचंच प्रतिबिंब आहे. आजच्या काळात कोणत्याही नेत्याचं हे कर्तव्य असतं की त्यानं आपल्या देशवासीयांमधला आत्मविश्वास जागृत करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय देशाची कल्पनाच करता येत नाही. शेकडो आक्रमकांमुळे समाज कमकुवत झाला होता. आपल्या सांस्कृतिक केंद्रांवर हल्ला करून लोकांचं मनोधैर्य तोडण्याचा प्रयत्न झाला. अशा वेळी लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणं हे कठीण काम होतं. पण शिवाजी महाराजांनी फक्त आक्रमकांचा सामनाच केला नाही तर जनतेमध्ये हा विश्वास निर्माण केला की स्वराज्य शक्य आहे. त्यांनी गुलामगिरीची मानसिकता संपवून लोकांना राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित केलं - नरेंद्र मोदी

10:39 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live:

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक अद्भुत अध्याय आहे. यासंदर्भातल्या महान गाथा आपल्याला आजही प्रेरणा देतात. राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण या शासनव्यवस्थेची मूल तत्व होती. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करतो. आज स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ल्याच्या प्रांगणात सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. यासाठी मी महाराष्ट्र सरकारलाही शुभेच्छा देतो - नरेंद्र मोदी

10:37 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा...

शिवस्मारक बांधण्याच्या कामासाठी पंतप्रधानांकडे आम्ही पाठपुरावा करू. शिवाय, रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: प्रयत्न करतील. शिवसृष्टी उभारण्याच्या मागणीसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठपुरावा करेन - देवेंद्र फडणवीस

10:12 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: "...मग उपकार केले का?"

तुम्ही राज्याभिषेक सोहळा साजरा करता, मग उपकार करताय का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही राज्य चालवतो. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या विश्वाचं दैवत आहेत. जगभरात शिवाजी महाराजांची वाहवा केली जाते. त्यामुळे छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा उत्तम प्रकारे करणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक राज्यकर्त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही त्या सोहळ्याला अभिवादनच करतो - संजय राऊत

09:48 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: छत्रपती शिवरायांना पोलिसांकडून सलामी

छत्रपती शिवाजी महाराजांना पोलीस पथकाकडून रायगडावर सलामी देण्यात आली.

09:25 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: ठाकरे गटाकडून छत्रपतींना 'मानाचा मुजरा'

उद्धव ठाकरे गटाकडून जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1664459967783645184

09:17 (IST) 2 Jun 2023
“माझी एक तीव्र इच्छा आहे…”, राज ठाकरेंची शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला पोस्ट; म्हणाले, “..म्हणून आपल्याला पुतळ्यांची गरज!”

राज ठाकरे म्हणतात, “आपल्याकडे महापुरुष, त्यांचे विचार आपल्या धमण्यामंध्ये सळसळत नाहीत म्हणून आपल्याला जागोजागी पुतळ्यांची गरज लागते. हे चित्र…!”

वाचा सविस्तर

09:11 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: मुख्य सोहळ्याला सुरुवात

रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह उदयनराजे भोसले, दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे आदी सत्ताधारी पक्षांमधील दिग्गज नेत्यांची उपस्थिती आहे.

08:50 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं रायगडावर आगमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं रायगडावर आगमन झालं आहे.

08:49 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: राज ठाकरेंचा शिवप्रेमींसाठी संदेश!

राज ठाकरेंचा शिवप्रेमींसाठी संदेश!

https://twitter.com/RajThackeray/status/1664273424536207362

08:43 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: देवंद्र फडणवीसांनी ट्वीट केला व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस म्हणतात...

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1664341052600500225

08:43 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: भाजपा नेते राम शिंदेंची प्रतिक्रिया

"शिवछत्रपतींचा राज्याभिषेक महाराष्ट्रच नाही, देशच नाही तर अवघ्या जगासाठी आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होण्यासाठी इथे सगळे जमले आहेत. महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते इथे येत आहेत. आनंद वाटतोय. राज्य सरकारने यासाठी सर्व काळजी घेतली आहे. कुणाचीही अडचण होता कामा नये यासाठी सर्व नियोजन केलं आहे. तिथी आणि तारखेनुसार या सात दिवसांच्या कालखंडात हा सोहळा होतोय. त्यानिमित्ताने सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत", अशी प्रतिक्रिया भाजपा नेते राम शिंदे यांनी दिली.

08:42 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: विविध उपक्रमसांठी ३५० कोटींचा निधी

शिवराज्याभिषेकाचं हे ३५०वं वर्षं असून यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातच ३५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. "छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर अंगी स्फुरण चढणार नाही, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा आपण उत्साहात साजरा करत आहोत. महाराष्ट्र सरकारतर्फे शिवराज्याभिषेक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.विविध कार्यक्रमांसाठी ३५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे", असं ते म्हणाले.

08:42 (IST) 2 Jun 2023
Shivaji Maharaj Rajyabhishek Din Live: १ ते ७ जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन

"पुण्याच्या आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान आपण उभारत आहोत. याचप्रमाणे मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी दृकश्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्यानं विकसित केली जाणार आहेत. या उद्यानांमध्ये छत्रपती शिवरायांची जीवनगाथा प्रदर्शित केली जाईल. शिवरायांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारलं जाणार आहे. शिवराज्याभिषेक दिन सदैव स्वराज्याची, सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा दिवस. या दिवसानिमित्त रायगडावर राज्य सरकारतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचं तर रायगडाच्या पायथ्याशी १ ते ७ जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे", अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडीओमध्ये दिली आहे.

shivrajyabhishek din

Shivrajyabhishek Din: रायगडासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह!

Story img Loader