Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Sindhudurg Indian : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र हा पुतळा आज सोमवारी (२६ ऑगस्ट) दुपारी दीडच्या सुमारास कोसळला. त्यामुळे सरकारच्या कारभारावर जोरदार टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. पाठोपाठ नौदलाने देखील या दुर्घटनेप्रकरणी निवेदन जारी करत खंत व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा