सावंतवाडी : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक यांसह व गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे साहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांच्या तक्रारीनंतर मालवण पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. यावरून शिवप्रेमी आणि विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असताना पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी दिलेल्या भेटीदरम्यान संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर तातडीने कार्यवाही करताना सोमवारी रात्री उशिरा पोलिसांत तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार, राजकोट येथील शिवरायांचा पुतळा शतकानुशतके सुस्थितीत, सुरक्षित व दिमाखात उभा राहील, या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक होते. पुतळा कोसळला तर त्याजवळचे पर्यटक किंवा इतरांचा मृत्यू होईल, अपरिमित जीवित व वित्तहानी होईल याची पूर्ण जाणीव असतानाही शिल्पकार व बांधकाम सल्लागारांनी पुतळ्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष केले. अभ्यास न करता निकृष्ट दर्जाने पुतळ्याची उभारणी केली. त्यानंतर आपटे व पाटील यांच्यावर संगनमताने हे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

two wheeler rider senior citizen injured due to Manja
पुणे : जीवघेण्या नायलाॅन मांजामुळे ज्येष्ठ नागरिकांसह तिघे जखमी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
thane palghar gold chain snatcher loksatta news
ठाणे, पालघरमध्ये सोनसाखळ्या चोरणारे गुजरातचे दोन सराईत चोरटे अटकेत, २० गुन्हे केल्याची चोरट्यांची कबुली
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
bmc has decided to completely ban POP idols during Maghi Ganeshotsav
‘पीओपी’वरून पुन्हा घोळ आयत्या वेळच्या घोषणेमुळे माघी गणेशोत्सवात मूर्तिकार, मंडळांसमोर फेरनियोजनाचे आव्हान
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

हेही वाचा : मंत्र्यांच्या बंगल्यावर तिऱ्हाईताकडून खातेबैठका

नाईक यांच्यावरही गुन्हा

पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मोडतोड केली होती. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला (पान १० वर) (पान १ वरून) आहे. दरम्यान, नाईक यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागावर पुन्हा टीका केली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मालवणला भेट देणार आहेत.

नौदल अधिकाऱ्यांकडून पाहणी

पुतळा उभारणीच्या कामात समन्वयक म्हणून काम पाहणारे लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील व कमांडर सुशील कुमार राय या दोन अधिकाऱ्यांनी मंगळवारी राजकोट येथे पाहणी केली. या घटनेसंदर्भात लवकरच अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नौदल अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात केसरकर यांच्याशी चर्चाही केली. या चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही. पुतळा लवकरात लवकर नव्याने उभा करण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली येथे सांगितले.

हेही वाचा : Harshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील विधानसभेला तुतारी हाती घेणार? शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले…

ही दुर्घटना असली तरी यामधून काहीतरी चांगले घडावे. मुंबईजवळ अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम थांबले आहे. तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर उभारला जावा आणि लोकार्पणासाठी पंतप्रधानांना बोलवावे.

दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

गद्दार पुन्हा पुतळा उभारू असं म्हणत आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. त्यामुळे त्यांना क्षमा नाही. शिवप्रेमी पुतळा उभारतील.

विनायक राऊत, माजी खासदार

Story img Loader