सांगली : आष्टा शहरात भाजप कार्यकर्त्यांनी विनापरवाना बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा रात्री प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलवला. प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेच्या निषेधार्थ आष्टा व इस्लामपूर शहरात बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आल्याने आष्टा शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. मात्र आता बंद मागे घेण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आठ दिवसापुर्वी महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सिंहासनाधिष्ठित शिवरायांचा बसविल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही ही कृती केली. आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरून राष्ट्रवादी-ठाकरे शिवसेना विरुध्द भाजप असे राजकारण रंगले आहे. आष्टा शहरात 8 दिवसात दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीत बसवला. जागा हस्तांतरणासाठी सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवसापुर्वी आंदोलनही करण्यात आले होते.
मात्र, जिल्हा प्रशासनाकडून पुतळ्याच्या जागेला मंजुरी मिळत नसल्याने रात्रीत शिवरायांचा पुतळा बसविण्याचे प्रकार आठवड्यात दोनदा घडले. अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत आष्टा पालिकेत दहा वर्षापुर्वी ठराव झाला आहे. समितीमार्फत पुतळ्यासाठी जागा मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून याबाबत आज बुधवारी निर्णय अपेक्षित आहे.
हेही वाचा… अखेर अंधार दाटलाच!, उमरेड, भिवापूरच्या बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित
दरम्यान काल शिवाजी चौकात पुतळा बसविल्यानंतर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. रात्री उशिरा पोलीसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशीकांत भोसले पाटील यांच्यासह पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार झाला. रात्री उशिरा कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.
दरम्यान मध्यरात्री शिवाजी चौकात विनापरवाना बसविण्यात आलेला महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आष्टा व इस्लामपूर शहरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आष्ट्यात भावई उत्सव चालू असल्याने बंदमध्ये सहभागी होऊ नये असेही आवाहन एका गटाकडून करण्यात आले आहे. दरम्यान जागा हस्तांतरण प्रक्रिया येत्या दोन दिवसात अपेक्षित असून नगरपालिकेने पुतळ्यासाठी २५ लाखाची तरतूद केली आहे. कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर समितीच्यावतीने महाराजांचा पुतळा उभारणीचे कार्य हाती घेण्यात येईल अशी माहिती पुतळा समितीचे अध्यक्ष विशाल शिंदे यांनी सांगितले.