Chhatrapati Shivaji Statue Collapse: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळ्याचे काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. मात्र छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीकडून आज मालवण येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मालवण येथे पत्रकार परिषद घेतली. पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारकडून नौदलाकडे बोट दाखविले जात आहे. पण शिल्पकार आपटेचा पत्ता नौदलाला कुणी दिला? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकारातूनच झाले होते.

राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारून माफी मागावी

जयंत पाटील पुढे म्हमाले, कल्याणमध्ये राहणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटेचा पत्ता नौदलाला सांगण्याचे काम कुणी केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीच हे काम करून घेतले. नौदलाने फक्त पुतळा पूर्ण करून आल्यानंतर तिथे बसविला. त्यामुळे संपूर्ण दोष राज्य सरकारचा आहे. नौदलाच्या अखत्यारीत असलेल्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले होते. केवळ आठ महिन्यात वादळ-वाऱ्याचा कोणताही अभ्यास न करता पुतळा उभारला गेला. त्यामुळे राज्य सरकारने आता जबाबदारी स्वीकारून राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
When the rains return now there is a cyclone warning
Maharashtra News : पावसाच्या परतीची वेळ असताना आता चक्रीवादळाचा इशारा
Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed in Malvan
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया, दुर्घटनेचं कारण काय?
Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Rajiv mishra on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: “आम्ही फक्त सहा फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली होती, पण…”, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रांचे मोठे विधान
Supreme Court Contempt Notice To Maharashtra additional Chief Secretary
Supreme Court : “हे कसले IAS अधिकारी?” सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सुनावलं, नोटीसह बजावली

हे वाचा >> Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत असल्यामुळे पुतळा पडला. पण आमच्या माहितीप्रमाणे ताशी २७ किमी वेगाने वारे वाहत होते, त्यापेक्षा अधिक वाऱ्याचा वेग नव्हता. जर वाऱ्याचा वेग अधिक असता तर दोन-चार झाडेही पडली असती, पण तसे न होता फक्त पुतळा पडला. याचा अर्थ पुतळ्याचे काम सदोष होते. पुतळ्याचे स्ट्रक्चर कमकुवत होते, याची चौकशी सरकारने केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामातही सरकारने भ्रष्टाचार केला. अनुभव नसलेल्या, अपरिपक्व अशा माणसाला केवळ आपला मित्र आहे म्हणून काम देण्यात आले. ज्याने दीड-दोन फुटाचे पुतळे बनविले होते, त्याला २८ फुटांचा पुतळा बनविण्याचे काम दिले, असा असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

हे ही वाचा >> “कोण हा आपटे? महाराष्ट्र सरकारने पुढील २४ तासांत…”, जितेंद्र आव्हाडांचं सरकारला आव्हान

२८ फुटांचा पुतळा उभारता आला नाही, आता १०० फुटांचा पुतळा उभारणार

जयंत पाटील यांनी यावेळी सिंधुदुर्गमधील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली. या वाईट घटनेतून काहीतरी चांगले घडेल, असे विधान केसरकर यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेताना जयंत पाटील म्हणाले की, चांगले एकच घडणार ते म्हणजे हे सरकार पडणार. ज्यांना २८ फुटांचा पुतळा व्यवस्थित उभारता आला नाही, ते आता १०० फुटांचा पुतळा उभारण्याची भाषा करत असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.