Chhatrapati Shivaji Statue राजकोट किल्ल्यावर नौदलातर्फे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Chhatrapati Shivaji Statue ) हा २६ ऑगस्टला पडला. हा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तर हा भावनेचा प्रश्न आहे, कुणीही याचं राजकारण करु नये असं सरकारतर्फे सांगण्यात येतं आहे. मात्र आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केला आहे. शिल्पकार जयदीप आपटे संघाचा असल्याने त्याला काम दिलं गेलं, त्याला शिल्प घडवण्याचा अनुभव नसताना हे काम देण्यात आलं असं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे पुतळा ( Chhatrapati Shivaji Statue ) कोसळल्याच्या घटनेवरुन सुरु झालेलं राजकारण अद्याप थांबलेलं दिसत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय घडली घटना?
मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Statue ) कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या पुतळ्याची ( Chhatrapati Shivaji Statue ) उभारणी नौदलामार्फत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले असले तरी, विरोधी पक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर या दुर्घटनेचे खापर फोडले आहे. या घटनेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली तर, रवींद्र चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उबाठा, काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनीही राज्य सरकारवर टीका केली.
हे पण वाचा- Jayadeep Apte : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर चर्चेत आलेला शिल्पकार जयदीप आपटे कोण?
जयदीप आपटे संघाचा माणूस, पटोलेंचा आरोप
“आपल्याला माहीतच आहे की शिवरायांचा पुतळा ( Chhatrapati Shivaji Statue ) उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने घाई केली. ही बाब आता निदर्शनाला येते आहेच. सांस्कृतिक संचलनालयाकडून पुतळा प्रमाणित करायला हवा होता तो केला गेला नाही. शिल्पकार जयदीप आपटेला अनुभव नव्हता, अनुभव नसणाऱ्या व्यक्तीला हा पुतळा बनवण्याचं काम देण्यात आलं. शिल्पकार जयदीप आपटे तो संघाचा माणूस आहे. आरएसएसच्या माणसाला काम देण्याचं कारण काय? असं नाना पटोले म्हणाले.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डोक्यात कापड आणि कागद भरले होते
यापुढे पटोले म्हणाले, “अशी माहितीही समोर येते आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं जे डोकं होतं त्यात या शिल्पकाराने कागद आणि कापड भरलं होतं, ही बाबही निदर्शनाला आली आहे. पेशवाईच्या काळात जसा छत्रपती शिवरायांचा अपमान केला जात होता तसाच लोकशाही माध्यमातून आलेल्या सरकारचा अपमान केला. असंवैधिनिक सरकारने जाणूनबुजून महाराजांचा अपमान केला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून पुतळा उभारला गेला, त्यानंतर आठ महिन्यांताच पुतळा पडला. याचं मुख्य कारण फक्त आर्किटेक्ट नाही किंवा मूर्तीकार नाही पण आमचं हे म्हणणं आहे की केंद्र आणि राज्य सरकारची ही चूक आहे” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
राजकारण आम्ही नाही तर भाजपाचे लोक करत आहेत
“देवेंद्र फडणवीस आमच्यावर आरोप करतात की आम्ही राजकारण करतो, आम्ही राजकारण करत नाही. बदलापूरच्या घटनेतही विरोधकांवर त्यांनी हाच आरोप केला आहे. मात्र हे सरकार कमिशन खोर आहे. जनतेचे पैसे लुटून महाराजांचा अपमान केला जातो आहे. याला काय म्हणायचं? हे कुठलं राजकारण आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावं. तसंच छत्रपती शिवरायांचा पुतळा पडण्यामागे राजकारण नाही, हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राची जनता आता यांना (महायुती) खरं राजकारण काय आहे ते दाखवणार आहे. यांचा प्रॉब्लेम असा आहे की निवडणूक कधी घेतील हा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वन नेशन वन इलेक्शन. पण जे पंतप्रधान चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही त्यांना हा नारा द्यायचा काय अधिकार आहे? भाजपाचं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेलं राज्यातलं सरकार आणि केंद्रातलं भाजपाचं सरकार हेच राजकारण करत आहेत. महाराजांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही.” असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.