एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाकडून ज्या पदावर दावा सांगितला जातोय, ते पदच बेकायदेशीर आहे, अशी प्रतिक्रिया वकील सनी जैन यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना निर्माण होत नाही” अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला!

निवडणूक आयोगासमोर पार पडलेल्या सुनावणीबाबत अधिक माहिती देताना सनी जैन म्हणाले, “शिंदे गटाकडून ज्या पदावर दावा सांगितला जात आहे, ते ‘मुख्य नेता’ पद बेकायदेशीर आहे. पक्षाच्या संविधानात असं कोणतंही पद नाही. संविधानात ‘मुख्य नेता’ पद नसेल तर एकनाथ शिंदे स्वत:ला ‘मुख्य नेता’ कसं काय म्हणू शकतात, यावरच आज युक्तीवाद झाला.”

हेही वाचा- शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी; संजय राऊत म्हणाले, “शिंदे गटाचे आमदार…”

“दरम्यान, आम्ही निवडणूक आयोगाकडे एक पत्र सादर केलं. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी ‘पक्षाच्या संविधानावर श्रद्धा आणि निष्ठा ठेवेन’ अशी शपथ घेतली होती. आज त्याच संविधानाला शिंदे गट बेकायदेशीर म्हणत आहेत. हा खूप मोठा विरोधाभास आहे. एकनाथ शिंदे स्वत:ला ‘मुख्य नेता’ म्हणत आहेत, पक्षप्रमुख म्हणत नाहीत,” अशी माहितीही सनी जैन यांनी दिली.