अलिबाग – इरशाळवाडीच्या दरड ग्रस्तांसाठी सिडकोच्या माध्यमातून ४४ कायमस्वरूपी घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी विस्थापित कुटुंबांना नवीन घरांचा ताबा दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या घरांची पाहणी केल्यानंतर ते इरशाळवाडी येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इरशाळवाडी  दुर्घटना अतिशय दुर्देवी, अनेक कुटुंब मृत्यूमुखी, तात्काळ पुनर्वसन व पर्यायी व्यवस्था सिडको ने चांगल्या प्रकारे केली. फक्त घरे नाही तर आजू बाजूला परिसर, भाजी पाला पण लावता येईल, गाई गुरांचा गोठा, अंगणवाडी, बालवाडी, समाज मंदिर, दवाखाना, प्ले ग्राउंड, गार्डन, सगळ्या सोई सुविधा याठिकाणी दिलेल्या आहेत.

हेही वाचा >>>Raj Thackeray: “संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…”, मंत्रालयात आमदारांनी जाळीवर उड्या मारल्यानंतर राज ठाकरेंची संतप्त पोस्ट

मला समाधान आहे, दरडग्रस्त कुटुंबांसाठी सिडको ने अतिशय चांगल्या दर्जाची घरे बांधून दिली आहेत अतिशय जलद गतीने हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व विस्थापित कुटुंबांना नवीन घरांचा ताबा दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

त्याचबरोबर इरशाळवाडीतील सुशिक्षित तरुण युवकांना उदरनिर्वाह चे साधन मुख्यमंत्री व्यवसाय प्रशिक्षण योजनेअंतर्गत सिडकोमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. महिलांनाही बचत गटाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना प्रशासनाला देण्यात आले आहेत. चौक ते नाणीवली रस्त्याबाबत आताच बाब समोर आली त्या बाबत ही तात्काळ तोडगा काढण्यात येईल अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी या आदिवासी वस्तीवर १९ जुलैच्या रात्री दरड कोसळली होती. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला तर ५७ जण जणांचा बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंतर इरशाळवाडीचे कायमस्वरूपी पुर्नवर्सन करण्याची घोषणा राज्यसरकारने केली होती. अवघ्या सात दिवसात दरडग्रस्तांना  तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर हाऊस उपलब्ध करून दिली होती. यावेळी आपदग्रस्तांना विक्रमी वेळेत पक्की घरे बांधून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणे नंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या.

हेही वाचा >>>Ahilyanagar : अहमदनगर नव्हे अहिल्यानगर! महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

त्यानुसार सुरवातीला इरशाळवाडीच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी चौक येथील मानिवली येथील २.६० हेक्टर जागा तातडीने हस्तातंरीत आली. एमएसआरडीसीने पुनर्वसन आराखडा तयार करून त्याला मंजूरी दिली. प्रत्येकी तीन गुंठे जागेवर, प्रि कास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून एकूण ४४ घरांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सिडकोला हे काम देण्यात आले.आपदग्रस्त कुटूंबांना घरांसोबत शाळा, समाजमंदीर, खेळाचे मैदान या सुविधाही पुरवल्‍या जाणार आहेत. अंतर्गत रस्ते, पाणी, आणि वीज आदि सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.

काय आहे प्री कास्‍ट तंत्रज्ञान ?

प्री कास्ट तंत्रज्ञान म्हणजे कमी वेळात अधिक काम. घर तयार करण्यापूर्वी त्याची संकल्पना तयार केली जाते. कास्टिंग केलं जातं आणि त्याचे मोल्ड बनवले जातात.त्यानुसार घराचे वेगवेगळे भाग काँक्रिट मध्ये तयार केले जातात.आणि ते जोडून घर उभे राहते. यामध्ये वेळ कमी लागतो , घरे अधिक मजबूत आणि टिकाऊ होतात.

कशी असेल घरांची रचना….

प्रत्येकी तीन गुंठे जागेमध्ये एकूण ४४  घरे उभारली जात आहेत. हॉल, किचन, बेड रूम, स्वच्छता गृह, आणि मोकळी जागा अशी घरांची रचना आहे. सर्व घरे काँक्रिटची आहेत. छप्पर स्लॅबचे असेल. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र नाला असेल ज्यामुळे घरांना धोका होणार नाही.