ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज अहमदगनर दौऱ्यावर असून त्यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला असून त्यांना आता विमा आणि नुकसानभरपाईची प्रतिक्षा आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा >> “शेतकऱ्यांवर अस्मानी नाहीतर सरकारची सुल्तानी…”, पीकविमा आणि नुकसानभरपाईसाठी ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “…तर मविआचे कार्यकर्ते फडणवीस, अजित पवारांच्या बॅगा तपासतील”, निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची तपासणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

“सरकार फक्त दारोदारी फिरत असून आराम करायला हेलिकॉप्टरने शेतात जात आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ते पुढे म्हणाले की, “त्यापेक्षा त्यांनी हेलिकॉप्टरने त्यांच्या शेतात यावं, म्हणजे खरा शेतकरी काय असतो हे कळेल. पंचतारांकित यांची (एकनाथ शिंदेंची) शेती असेल. पण माझा शेतकरी साधा भोळा आहे आणि अन्नदाता आहे. अन्नदात्याचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे. कारण अन्नदात्याचे शाप फार वाईट असतात. तो कोणाला भोगायला लागू नयेत असं मला वाटतं”, असंही ते पुढे म्हणाले.

“एक रुपयात विमा देतात, पण अर्ज भरण्यात किती रुपये जातात हे कोणी पाहत नाही. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना न होता मित्रमंडळांच्या विमा कंपन्यांना होत असेल तर हा भ्रष्टाचार लोकांसमोर आलेला नाही असं समजू नका”, असंही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “…म्हणून पोलिसांनी लाठीमार केला”, दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “मराठा समाजाने…”

विशेष अधिवेशात मराठा, धनगर, ओबीसीच्या मागण्या सत्कारणी लावाव्यात. दिल्लीबाबतचा निकाल संसदेच्या खासगी बहुमताने फिरवला. त्यामुळे या समाजासाठीही निर्णय घ्यावा, असंही ठाकरे म्हणाले.

हे तिडमागडं सरकार

“काल मी असं ऐकलं की वीमा कंपन्यांना २५ टक्के रक्कम देता येतेय का ते पाहा, असं सरकारने सांगितलं आहे. पण २५ टक्के कुठून काढलंत आपण. १०० टक्के नुकसान झाल्याचं दिसतंय, तिथे पंचनामे कधी करणार? पाऊस लागला तर सरकार म्हणेल की पाऊसच पाऊस चहुकडे. अशा परिस्थितीत सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी अशी परिस्थिती आहे. हे तिडमागडं सरकार आहे. तीन तिघाडा काम बिघाडा सरकार आहे. कार्यक्रम, जाहिराती जोरात करतंय. जाहिरांतीवर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे दिले तर बरं होईल”, अशी टीकाही त्यांनी केली.