सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर याच्याबरोबरीने पकडला गेलेला शाखा अभियंता जगदीश वाघ यानेही कोटय़वधींची माया जमवल्याचे तपासात उघड झाले आहे. लाचलुचपत विरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी वाघ याच्या बँक खात्यांची चौकशी केली. त्यात त्याच्याकडे एक कोटी १३ लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले. तर चिखलीकरच्या घरात पाच लाखांची रोकड सापडली. ठेकेदाराचे देयक मंजूर करण्यासाठी २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडल्या गेलेल्या या दोन्ही अभियंत्यांच्या मालमत्तेची मोजदाद करता करता लाचलुचपतविरोधी विभागाची दमछाक होत आहे. या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत १६ मे रोजी संपुष्टात येत आहे.
रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर लाचलुचपतविरोधी विभागाने त्यांना ताब्यात घेत चौकशीचे काम बुधवारी पुन्हा सुरू केले. त्यात नाशिक र्मचट बँकेतील दोन वेगवेगळ्या शाखांमधील खात्यात वाघ व त्याची पत्नी दीपाली यांच्या नावावर ९८ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले. तसेच याच बँकेत संबंधितांच्या नांवे १५ लाखाच्या ठेवी आहेत. वाघकडे या बँकांमध्ये एक कोटी १३ लाखाची रक्कम आढळून आली असून त्याच्या एकूण मालमत्तेने दोन कोटी २२ लाखाचा आकडा गाठल्याचे या विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा