जालना : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात पेन्टा लस दिल्यानंतर एका अडीच महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आरोग्य संचालक आणि उपसंचालकांकडे प्राथमिक अहवाल पाठविला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी गुरुवारी हसनाबाद आरोग्य केंद्रात या प्रकरणी चौकशी केली.

भोकरदन तालुक्यातील सावखेडा येथे माहेरी आलेल्या रंजना मनोज सोनवणे यांच्या अडीच महिन्यांच्या मुलास हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात डीपीटी लस देण्यात आली. त्यानंतर या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी हसनाबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बालकाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आक्रोश केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. डॉ. खतगावकर यांनी सांगितले, की नातेवाइकांनी या संदर्भात तक्रारी केल्या असून या प्रकरणी प्राथमिक चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.

Story img Loader