जालना – भोकरदन तालुक्यातील कुंभारी गाव परिसरात चार्जिंगला लावलेल्या मोबाईल फोन बॅटरीच्या स्फोटात दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. समर्थ परशुराम तायडे (रा. आमठाणा ता. सिल्लोड), असे मृत मुलाचे नाव आहे.

भोकरदन शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जालना रोडवरील कुंभारी येथे गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी झाला. कार्यक्रम आटोपून 4.मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास तायडे कुटुंब आपल्या मुळ गावी आमठाणा येथे परतणार होते. मात्र चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असताना मोबाईलची खराब बॅटरी बालकाने कानाला लावली आणि त्याच क्षणी त्याचा स्फोट होऊन यात बालकाचे कानाला व हाताच्या बोटाला गंभीर मार लागला. दरम्यान भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात समर्थला दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले, असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

Story img Loader