बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यामध्ये जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावातील सहा वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला, तर अडीच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर पिंपरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खामुंडी गावातील जंगलालगतच्या बाडगी येथे बिबटय़ाने प्रवीण देवराम दुधवडे (वय ६ मूळ रा . पिंपळगाव माथा ता. संगमनेर, जि.नगर) याच्यावर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. प्रवीण हा आईसमवेत आजोळी आला होता. प्रवीणची आजी सगुणाबाई पहाटे उठून काही वेळासाठी बाहेर गेल्या. तेवढय़ात प्रवीणला बिबटय़ा पळवून नेत होता. सगुणाबाई यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हुलकावणी देऊन बिबटय़ाने प्रवीणला घरापासून एक किमी अंतरावर फरफटत नेले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child killed in leopard attack at junnar