रवींद्र पाथरे

बेळगावी : ‘‘बालप्रेक्षकांसाठी केलेले नाटक म्हणजे बालनाटय़’ असा एक प्रचलित समज आहे. परंतु तो पूर्णपणे बरोबर नाही. विविध वयोगटांतील मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची नाटके सादर करायला हवीत. म्हणजे पाच-सात वर्षांच्या मुलांसाठी केली जाणारी नाटके ही त्यांचे वय, त्यांची आकलनशक्ती, त्यांचे भावविश्व यांचा विचार करून सादर व्हायला हवीत. तशीच त्यापुढच्या वयाच्या मुलांसाठीची नाटके विषय, आशय, सादरीकरणात त्याहून वेगळीच असायला हवीत. तर १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी सादर होणारी नाटके त्यांच्या वयाच्या निकडीनुसार अधिक प्रगल्भ विषयांवरची असायला हवीत. सरसकट सगळ्यांना एकाच प्रकारची बालनाटय़े भावणे शक्य नाही. परंतु हा विचार अजूनही आपल्याकडे तितकासा रुजलेला नाही,’ अशी खंत बेळगावी येथे भरलेल्या पहिल्या बालनाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना मीना नाईक यांनी बोलून दाखवली. ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेने अ. भा. मराठी नाटय़ परिषद, बेळगावी शाखा आणि ‘फुलोरा’ या संस्थांच्या सहयोगाने हे बालनाटय़ संमेलन आयोजित केले आहे.

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
school Teacher misbehaved with girls
रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत शिक्षकाला केले निलंबित
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!
children passport loksatta news
पालकांच्या वादात अल्पवयीन मुलांना पारपत्रापासून वंचित ठेवता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

आज मुलांचे वाचन कमी झाले आहे. त्यामुळे बालनाटय़ांतून त्यांना थेट जीवनानुभव आणि संस्कार मिळणे गरजेचे आहे, जे काम एकेकाळी सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे या मंडळींनी समर्पित भावनेने केले. बालनाटय़ चळवळीच्या इतिहासाचा समग्र आढावा घेऊन मीना नाईक यांनी सध्याच्या बालरंगभूमीसमोरच्या अनेक अडचणींचाही पाढा वाचला.

‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’च्या अध्यक्ष आणि या संमेलनाच्या कर्त्यांधर्त्यां वीणा लोकूर यांनी या संमेलनामागची आपली भूमिका विशद केली. सध्या बालनाटय़ाच्या नावाखाली रंगभूमीवर जे काही भयाण सादर होते आहे, ते पाहून नव्याने बालनाटय़ाचा विचार व्हायला हवा असे वाटणाऱ्या संवेदनशील रंगकर्मीनी पुढाकार घेऊन ‘बालरंगभूमी अभियान’ ही संस्था स्थापन केली असून, तीद्वारे बालनाटय़ नेमके कसे असावे, त्यात कोणते विषय, आशय सादर व्हावेत याबद्दलचा गांभीर्याने आम्ही विचार करीत आहोत. त्यादृष्टीने आमचे काहीएक प्रयत्नही सुरू आहेत. त्याचेच फलित म्हणजे हे बालनाटय़ संमेलन होय, असे त्यांनी सांगितले.

अभिनेत्री सई लोकूर यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. त्यांनी आपल्या कलाकारकीर्दीचा दाखला देत आताच्या मुलांना कशा प्रकारे बालनाटय़ाद्वारे आपला व्यक्तिमत्त्व विकास करता येईल याबद्दलचे आपले अनुभव सांगितले.अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या बेळगावी शाखेच्या अध्यक्ष प्रा, संध्या देशपांडे यांनी बेळगावकरांच्या वतीने उपस्थित रंगकर्मी, रसिक, पालक, शिक्षकांचे स्वागत केले. तर ‘बालरंगभूमी अभियान’चे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी बालप्रेक्षकांना बालगीताद्वारे संमेलनात सक्रीय सहभागी करून घेतले.

बेळगावीमधील अनगोळमध्ये संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भरलेल्या या संमेलनाचा प्रारंभ मुलांच्या ग्रंथदिंडीने झाला. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘होईन का मी कलाकार?’ हा मुलांशी गप्पागोष्टीच्या रूपातील संवादाचा कार्यक्रम सौमित्र पोटे आणि नरेंद्र कोठेकर यांनी संचालित केला. त्यानंतर ‘मूषक नगरी आणि जादूची बासरी’ आणि ‘अविस्मरणीय’ ही दोन बालनाटय़े सादर झाली.

Story img Loader