‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथील भीषण अपघातात मृत्यू झाला. सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येताना झालेल्या या अपघातामध्ये मिस्त्रींसहीत त्यांच्यासोबत जहांगीर पंडोल यांचाही मृत्यू झाला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज बेन्झ जीएलसी गाडीतील डेटा चीप ही जर्मनीला पाठवण्यात आली आहे. या अपघाताच्या तपासाचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रविवारपासून या प्रकरणाचा तपास सुरु असून अपघातातून बचावलेल्या दोन्ही व्यक्तींबरोबरच या डेटा चीपमधून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.

नक्की वाचा >> Cyrus Mistry Death: अपघात कसा झाला? प्राथमिक तपासात समोर आल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; ‘ती’ एक चूक जीवावर बेतली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“गाडीमधील डेटा चीपमध्ये गाडीसंदर्भातील सर्व माहिती रेकॉर्ड होते. यामध्ये अगदी क्षणोक्षणाची माहिती रेकॉर्ड केली जाते. ही चीप विश्लेषणसाठी जर्मनीला पाठवली जाणार आहे. या आठवड्याच्या अखेरीसपर्यंत या चीपसंदर्भातील सविस्तर अहवाल आम्हाला प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे,” अशं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिल्याची माहिती हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तात दिली आहे.

कंपनीचे अधिकाऱ्यांनी सोमवारी पालघरमध्ये जाऊन पोलिसांच्या देखरेखीखाली गाडीमधील इलेक्ट्रॉनिक चीप ताब्यात घेतली. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांच्या भरधाव मर्सिडीज कारची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये मरण पावलेल्या सायरस मिस्री आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळेच अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

नक्की वाचा >> Cyrus Mistry Death: सायर मिस्त्रींच्या निधनावर ‘टाटा सन्स’कडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एवढ्या कमी वयात त्यांचं निधन…”

कार पुलाच्या कठड्याला धडकताच कारमधील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या, मात्र मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने यांचे संरक्षण होऊ शकले नाही, असे सांगण्यात आलं आहे. मागील सीटवर बसल्यानंतर सीट बेल्ट न बांधण्याची चूक सायरस आणि त्यांच्यासोबतच्या प्रवाशाच्या जीवावर बेतली.