रत्नागिरी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना जिल्ह्यात राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी दोन्ही उमेदवारांची घोषणा झालेली आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रशांत यादव तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार शेखर निकम यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवाडी अशी लढत बघायला मिळणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण – संगमेश्वर हा विधानसभा मतदार संघ एक महत्वाचा मतदार संघ मानला जातो. या मतदार संघातून शिंदेच्या शिवसेनेकडून चिपळूण-संगमेश्वरची जागा लढवण्यासाठी अनेक इच्छुक तयार होते. तसेच चिपळूणच्या जागेसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनेही जोर लावला होता. मात्र आचारसंहितेच्या आधीपासून या दोन्ही शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे या मतदार संघातमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार हेच अपेक्षीत होते आणि तसेच घडले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातील पदाधिका-यांची बैठक बोलावली होती. मात्र राष्ट्रवादीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगले संबंध असल्याकारणाने चिपळूणची जागा तुतारीला म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडण्याचे फायलन करण्यात आले होते. तशा सूचनाही ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चिपळूणची जागा लढवण्याची घोषणा करण्यात आली होती.

Chiplun Vidhan Sabha Constituency Ajit Pawar NCP Candidate got ticket and Dhanushban Symbol no longer in Chiplun Assembly election 2024
३४ वर्षानंतर प्रथमच चिपळूणमध्ये ‘धनुष्यबाण’ चिन्ह हद्दपार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
vidhan sabha election 2024, Guhagar assembly, Rajesh Bendal
गुहागरच्या जागेचा तिढा सुटला; गुहागरसाठी शिंदे गटाचे राजेश बेंडल यांच्या नावावर शिक्कामोर्तब, माजी आमदार विनय नातू यांचा ग्रीन सिग्नल ?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
Breaking: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली; मतदान १५ दिवसांवर असताना मोठी घडामोड!

हेही वाचा…नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी, डॉ. मधुकर बाचूळकर यांचे टीकास्त्र

मात्र या जागेवरून शिंदे गटाने ही देखील माघार घेउन ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडली. या मतदार संघात अजित पवार गटात असलेले शेखर निकम हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा शेखर निकम यांनाच मिळणार यात कोणतीच शंका नव्हती. या मतदार संघातील काही नेत्यांनी अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर आपल्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तसे काहीच घडले नाही. चिपळूण संगमेश्वर मतदार संघात नाराजी असली तरी पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहे. या मतदार संघात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप असे सक्षम पक्ष आहेत. त्यामुळे या मतदार संघातील नाराज लोकांची समजूत काढण्यास सुरुवात झाली आहे. तर मतदारांना व कार्यकत्यांना खूश करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आता येणारा काळच ठरवणार आहे की, या मतदार संघावर अजित पवार यांची राष्ट्रवादी की शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्ता गाजवणार आहे. या निवडणुकीत अजित पवार यांचे उमेदवार यांना पक्ष फोडीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर राष्ट्रवादी पक्षा बरोबर एकनिष्ठ राहिलेले आणि शरद पवार यांची साथ न सोडणारे प्रशांत यादव यांना या गोष्टीचा फायदा होण्याची देखील शक्यता आहे. या मतदार संघातील हे दोन्ही उमेदवार शक्ती प्रदर्शन करत २४ तारखेलाच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा…महेश शिंदे, मकरंद पाटील यांना पुन्हा उमेदवारी, साथ दिलेल्या विद्यमान आमदारांवर विश्वास

चिपळूण संगमेश्वर या मतदार संघात शरद पवार यांना मानणारा मोठा मुस्लीम मतदार आहे. गेले कितेक वर्ष हा मतदार शरद पवार यांच्या सोबत आहे. त्यामुळे मुस्लीम मतदार येथील निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलवू शकतो. त्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरु शकतात असे मानले जात आहे.

Story img Loader