चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील संबंधित दोषी अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनेवर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या लिकेजबाबत स्थानिक लोकांनी आमदार,खासदार आणि संबंधित अधिकार्यांना कल्पना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
तिवरे धरणफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
रत्नागिरीतले तिवरे धरण फुटले; सहा जणांचा मृत्यू, १६ जण बेपत्ता
दरम्यान या दुर्घटनेला दोषी अधिकारी व आमदार, खासदार यांना जबाबदार धरण्यात यावे आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
Maharashtra CMO Sources: CM Fadnavis spoke to Ratnagiri Collector,other officials and took stock of situation after Tiware dam incident. CM expressed grief over loss of lives and ordered inquiry. SIT to be constituted. CM Devendra Fadnavis asked minister Girish Mahajan to visit. https://t.co/oItMQ8FXC8
— ANI (@ANI) July 3, 2019
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटल्याप्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत माहिती दिली आहे.
रत्नागिरीत झालेल्या तुफान पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आहे. या घटनेमुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जण बेपत्ता झाले आहेत. सहा मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. आलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. तिवरे धरण फुटल्याने शेजारच्या सहा ते सात गावांना या घटनेचा फटका बसला आहे.