शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि त्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून नवा वाद सुरू झाला होता. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही बाजूने ताकद पणाला लावली गेली आणि अखेर न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी येथे झाला. या दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका, आरोप झाले. तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांच्या नातावाचाही उल्लेख केल्याने, एकनाथ शिंदेंना राग अनावर झाल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले. उद्धव ठाकरेंच्या त्या विधानवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आता यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा