“निरंजन डावखरे यांनी एका मुस्लिम भगिनीशी विवाह केला आहे हे सामंजस्य वाढीला लागावे हीच इच्छा”, असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री उशिरा केले होते. लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याकरता हिंदू जनजागरण सभेचे निरंजन डावखरे यांनी आयोजन केल्याने जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांवर तोफ डागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“निरंजन डावखरे यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदू किती सडका आणि कुजका आहे हे दिसतेय.… वोट बँकच्या तुकड्यासाठी ‘लव्ह जिहाद’चं निर्लज्जपणे समर्थन करणारेच खऱ्या अर्थानं औरंगजेबाची वंशावळ चालवताहेत. सब का हिसाब होगा!” असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

जगातील सर्व धर्मातील महिला या शंभर वर्षांपूर्वी कशा होत्या आणि शंभर वर्षांनंतर कशा आहेत हे आपण जाणून आहोत. तेव्हा कुठल्याही वर्णाला, कुठल्याही वर्गाला तसेच स्त्री-पुरुषामध्ये भेदभाव न करता आपण सगळे सामान आहोत आणि बुद्धीजीवी आहोत एवढं लक्षात ठेवा. निरंजन डावखरे यांनी एका मुस्लिम भगिनीशी विवाह केला आहे हे सामंजस्य वाढीला लागावे हीच इच्छा”, असं ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >> “निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी विवाह केला, हे…”, लव्ह जिहादच्या ‘त्या’ बॅनरबाजीवरून आव्हाडांची प्रतिक्रिया

लव्ह जिहाद धर्मांतर आणि लँड जिहादविरोधी कायदा पूर्ण देशभर लागू करण्याकरता अॅड.निरंजन डावखरे यांनी हिंदू जनजागरण धर्मसभेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे संपूर्ण ठाणे शहरात पोस्टर्स लागले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने हजर राहण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.