पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळूनदेखील कर्नाटकमध्ये भाजपाचा दारुण पराभव होईल आणि हा २०२४ या वर्षासाठी शुभशकुन असेल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदी हे देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळत असून त्यांच्यावर बोलण्याची संजय राऊत यांची लायकी नाही, असे त्या म्हणाल्या. ट्वीटद्वारे त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “मी सामनाला महत्त्व देत नाही”, शरद पवारांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यासाठी, राम मंदिर बनवण्यासाठी, देशभर चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणि परदेशात भारताचा लौकिक वाढविण्यासाठी घाम गाळला आहे. तर सर्वज्ञानी संजय राऊत यांनी पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी, मराठी माणसाला लुटण्यासाठी, बेकायदा जमिनी खरेदी करण्यासाठी, कोविडमध्ये कंत्राटं घेऊन कमावण्यासाठी, गैरमार्गानं आलेले २५ लाख भरण्यासाठी घाम गाळला आहे, हे सर्व देशवासियांना माहिती आहे”, असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिलं.
“पंतप्रधानांवर बोलण्याची राऊतांचा लायकी नाही”
“पंतप्रधान मोदी गरिबांचं कल्याण करण्यासाठी आणि देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांवर बोलण्याची संजय राऊतांची लायकी नाही”, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा – Video: “कृपया आमच्याकडे पाहा, आम्ही वृद्ध आहोत, पण तरी…”, सुधा मूर्तींनी पिळले तरुणांचे कान!
संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका
दरम्यान, आज सकाळी संजय राऊतांनी कर्नाटक निवडणुकीवरून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. “आज कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होत असून या निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळूनदेखील भाजपाचा दारुण पराभव होईल आणि हा २०२४ साठी शुभशकुन असेल”, असं संजय राऊत म्हणाले होते.
यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारलाही लक्ष्य केलं होतं. “सध्याच्या मिंधे राज्यकर्त्यांनी आपल्या सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली. स्वतःला शिवसेना म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मंगलोरमार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली. महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे. मराठी माणूस हे लक्ष्यात ठेवील”, असे ते म्हणाले होते.