‘उत्तर प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा यायला पाहिजे’, अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मांडली. मुलींना लग्नाचं अमिष दाखवून पळवून नेलं जातं. धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जाते. हे पाहता लव्ह जिहादचा कायदा आलाच पाहिजे, असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे. त्या पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होत्या. 

महिलांनी बोलताना आपली एक रेषा आखून ठेवली पाहिजे. बोलताना मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. टाळ्या, शिट्ट्या अशी भाषा वापरली तरच मिळेल असा जर कोणाचा गैरसमज असेल तर तो करू नये. तो फार काळ टिकत नाही. अस म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरून केलेल्या वक्तव्यवर त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. चित्रा वाघ या

Arvi Constituency, Amar Kale Wife Mayura Kale,
आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nagpur, Narendra Modi, Narendra Modi marathi news,
मोदी विदर्भात येऊन नागपूरला येणे का टाळतात ? लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही प्रचिती
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
daughter cannot claim property if father dies before Hindu right of succession takes effect
हिंदू वारसा हक्क अंमलात येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू, मुलीला मालमत्तेवर हक्क सांगता येणार नाही

हेही वाचा- महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं…”

चित्रा वाघ म्हणाल्या की, महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आपण ही बोलताना आपली भाषा नीट वापरली पाहिजे. शब्दांचा नीट उपयोग केला पाहिजे. महिलांनी बोलताना आपली एक रेषा आखून घेतली पाहिजे. संस्कृतीच्या बाहेर झालं असेल तर लोकांचा तो उद्वेग असतो, तो ते व्यक्त करतात. नीलम गोर्हे या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यांच्याबाबत असा वाद उद्भवला असं मी पाहिलं नाही. टाळ्या, शिट्ट्या अशी भाषा वापरली तरच मिळतात असा जर गैरसमज कोणाचा असेल तर तो करू नये, तो फार काळ टिकत नसतो. महिला आणि पुरुषांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती आहे एकमेकांना कोपर खळ्या मारतो. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे अस चित्रा वाघ म्हणाल्या. 

पुढे त्या म्हणाल्या की, मुलींना पळवून नेणं, लग्नाचं अमिश दाखवणं, मुलींवर जबरदस्ती करणे, त्यांच्या आणि परिवारासाठी कुठलाच कायदा नाही. श्रद्धा वालकरची केस पुढे आल्याने हा विषय मोठा झाला आहे. आई वडिलांना ठोकर मारून तीने प्रेम केलं. त्या व्यक्तीवर विश्वास टाकला. तिचा अंत खूप वाईट झाला जो तिने कधीच विचार केला नसेल. मुलींना लग्नाचं अमिष दाखवून मुलीवर जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या या गोष्टी मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणून, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव्ह जिहाद कायदा यायलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या आहेत. 

हेही वाचा- “बहुमताचा आकडा १८२पर्यंत जाणार, नव्या वर्षात…”, उदय सामंत यांचा मोठा दावा; म्हणाले, “खरा धमाका…”!

संजय राऊत हे सर्वज्ञानी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज बद्दल बोलताना प्रसाद लाड यांच्यावर टीका करण्यात आली. त्यांनी चूक मान्य केली दिलगिरी व्यक्त केली होती. आता संजय राऊत यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माफी मागितली पाहिजे. पुढे ते म्हणाल्या की, महिला आमदार आमच्या पक्षात जास्त आहेत. भाजपा हा महिलांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. येणाऱ्या मंत्री मंडळात तीन- चार महिलांना नक्की प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.