सांगली : सांगली, मिरज शहरात आज नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळ निमित्त प्रार्थनेसाठी गिरीजाघरात जमलेल्या ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक हिंदू, मुस्लिम बांधव जमले होते. नाताळ सणानिमित्त सांगलीतील बालाजी चौक, मिरजेतील मिरज ख्रिश्चन चर्च या ठिकाणी प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची मोठी गर्दी जमली होती.

हेही वाचा >>> नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी

या निमित्त विषेश प्रार्थना, प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले होते. नाताळच्या सणानिमित्त शहरात विविध भागांत असलेल्या चर्चवर नयनमनोहर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी नऊ ते दहा या वेळेत सामूहिक प्रार्थना झाली. यानंतर प्रार्थना मंदिराबाहेर आल्यानंतर ख्रिस्ती बांधवांना सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शतकाची परंपरा असलेल्या मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये श्रीनिवास चोपडे यांनी प्रभू येशूची शिकवण प्रवचनातून सांगितली. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे, सचिन जाधव, दिगंबर जाधव, संदीप आवटी, गजानन कुल्लोळी, महमंद मणेर आदी उपस्थित होते.

Story img Loader