शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणात सीआयडीच्या हाती सबळ पुरावे आले आहेत. त्यानंतर सीआयडीने विनायक मेटे यांचा वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. रसायनी पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०४ (२) नुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपासात विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. याशिवाय तज्ज्ञांची एक समिती तयार करून त्यांच्याकडूनही याप्रकरणी मतं घेतली गेली. या समितीत आयआरबीचे अभियंता आणि इतरांचा समावेश होता.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू

सीसीटीव्हीत नेमकं काय आढळलं?

सीआयडीने केलेल्या सीसीटीव्ही तपासणीत विनायक मेटेंच्या चालकाने तासी १३०-१४० किलोमीटर वेगाने गाडी चालवल्याचं समोर आलं आहे. याशिवाय गाडीचा अपघात होण्याआधी चालक एकनाथ कदमने दुसरी गाडी ओव्हरटेक करत असतानाही आपली गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. जागा नसतानाही ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातच हा अपघात झाला, असंही या तपासात समोर आलं आहे.

हेही वाचा : “विनायक मेटे यावेळी मंत्रिपदाचे दावेदार होते, त्यांनी…”, भावूक होत दीपाली सय्यद यांचं मोठं विधान

या प्रकरणात रसायनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर लवकरच सीआयडी आरोपी चालक एकनाथ कदमला अटक करण्याची शक्यता आहे.

नेमकं झालं काय होतं?

मराठा आरक्षणासाठी १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं.

Story img Loader