सर्कशीतील प्राण्यांच्या प्रदर्शनावर आणि भ्रमणध्वनीवर मनोरंजनासाठी केल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या प्रदर्शनावर आता थेट केंद्रानेच कारवाईचा बडगा उगारला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या संदर्भात २८ नोव्हेंबरला अधिसूचना काढली असून याचे पालन सर्कशीचे मालक करणार का? तसेच भ्रमणध्वनीवरील प्राण्यांच्या प्रदर्शनावर आळा घालणे शक्य होईल का, हे मात्र येत्या काळातच कळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्कशीतील वन्यप्राण्यांच्या प्रदर्शनावर यापूर्वीच बंदी आणली होती. भारतीय पशुकल्याण मंडळाने सर्कशीतील प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेत प्राण्यांच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. मात्र त्याची अंमलबजावणी करणे हे एक आव्हान त्यांच्यापुढे होते. मंडळाने बंदी घातली असली तरीही त्याबाबत स्पष्ट आणि व्यापक आदेश नव्हते. त्यामुळे प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी केंद्राला वारंवार या विषयावर ठोस कायदेशीर पाऊल उचलण्याची मागणी केली होती. अनेक वर्षांनंतर का होईना २८ नोव्हेंबरला या विषयावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. ३० दिवसांच्या आत विविध संबंधितांनी त्यांच्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन या अधिसूचनेत केले आहे. या अधिसूचनेत सर्कशीत कोणताही प्राणी कामगिरी किंवा प्रदर्शनाकरिता वापरला जाणार नाही. तसेच भ्रमणध्वनीवरदेखील प्राण्यांचा वापर करून मनोरंजनाची सुविधा उपलब्ध असणार नाही, असे नमूद केले आहे. सर्कशीकडे लोकांच्या मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते. एक किंवा अधिक मोठय़ा तंबूत किंवा बाहेरच्या परिसरात सर्कस आयोजित केली जाते. यात प्राण्यांकडून विविध कलाकौशल्याच्या कसरती करून घेतल्या जातात. कित्येकदा त्यांच्याकडून अनैसर्गिक कामगिरी करून घेतली जाते. त्यासाठी प्रशिक्षकांकडून प्राण्यांचा छळदेखील केला जातो. प्राण्यांच्या कलाकृतीतून लोकांचे मनोरंजन होत असले तरी प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराची त्यांना कल्पना नसते. अनेक वर्षांपासून सर्कशीत घोडे, कुत्रे, पोपटांच्या विविध प्रजाती, हत्ती, पाणघोडा आदींचा वापर केला जात होता. सर्कशीतील हत्तीच्या वापरावर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने यापूर्वीच मान्यता नाकारली होती. कोणत्याही भारतीय वन्यप्राण्याचे सर्कशीत प्रदर्शन करण्यास मनाई होती. तरीही विदेशी वन्यप्राण्यांचा वापर होत आहे. हिप्पो, मकाऊ, कॉकाटूस या प्राण्यांची तस्करी करून अनैसर्गिक कामगिरीकरिता त्यांचा वापर केला जातो. या लुप्तप्राय प्रजाती असून त्यांच्या व्यापारावर र्निबध आहे. भारतीय पशुकल्याण मंडळाने अनेकदा सर्कशीतील प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेऊन त्यांच्या प्रदर्शनावर मनाई केली. मनोरंजनाच्या नावाखाली सर्कशीतील प्राण्यांच्या अनैसर्गिक कामगिरीवर प्रतिबंध घालण्यासाठी नियमांमध्ये दुरुस्ती करावी, अशी विनंतीदेखील पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स या संस्थेने पर्यावरण मंत्रालयाला केली होती.

सर्कसचालकांना या संदर्भात वारंवार सूचना देण्यात आल्या. सर्कशीत प्राण्यांचा वापर करू नका, असे सांगण्यात आले. तरीही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. मात्र आता केंद्राने याकरिता पाऊल उचलून सर्कशीत आणि भ्रमणध्वनीवर मनोरंजनासाठी प्राण्यांच्या वापरावर बंदी आणली. साप, माकड, पोपट यांसारख्या भारतीय वन्यप्राण्यांचा व्यवसाय किंवा त्यांच्या प्रदर्शनाकरिता वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत परवानगी दिली जात नाही. असे करताना कुणी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाते.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतलेला निर्णय चांगला आहे. कारण आम्ही जेव्हाही सर्कस किंवा इतर ठिकाणी कारवाई करण्यास जातो, तेव्हा अनेक कठीण प्रसंगांचा सामना आम्हाला करावा लागतो. कित्येकदा सर्कशीतील माणसे आमच्या अंगावर येतात, प्राणी अंगावर सोडतात. केंद्राच्या निर्णयामुळे कारवाईला बळ मिळेल. मात्र यासोबतच आता शंकरपटांसारख्या खेळांवरदेखील बंदी आणायला हवी. केरळ/ तमिळनाडूमध्ये जलीकट्टसारखा प्रकार महाराष्ट्रात शंकरपटाच्या नावाने चालतो. यात बैलांना दारू पाजणे, शेपटीला पीळ देणे यांसारखी अमानवी कृत्ये केली जातात. यावरही बंदी आणणे आवश्यक आहे.      – कौस्तुभ गावंडे, करुणाश्रम, पिपरी (मेघे)