सांगली : सांगलीजवळ समडोळीमध्ये जनावराच्या गोठ्याजवळ आलेल्या मगरीला नागरिकांनी पकडून वन विभागाच्या हवाली केले. समडोळी गावा जवळ असलेल्या खाणीतून एक मगर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जनावराच्या गोठ्या जवळ आली होती. सदरची घटना नागरिकांनी वन विभाग ला संपर्क करत कळवली. सदर मगर ही गावातील रेणुका मंदिर परिसराच्या मागील छप्परवजा गोठ्याच्या बाहेर बराच वेळ पडून होती. त्यामुळे नागरिकांनी तिला जेरबंद करत वन विभागाच्या ताब्यात दिली.

सदर घटनेची माहिती वन विभागास मिळताच उप वन संरक्षक नीता कट्टे , सहाय्यक वन संरक्षक अजित साजणे, यांच्या मार्गदर्शनात वन विभागाच्या कर्मचाऱ्यानी योग्य ती काळजी घेवून त्या मगरीला रात्रीच ताब्यात घेवून कुपवाड येथील कार्यालयात हलवले.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
इयन बोथम आणि मर्व्ह ह्यूज
मैदानावरच्या हाडवैरीने वाचवला मगरींच्या तावडीतून जीव; इयन बोथम यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

हेही वाचा…सांगलीत ५ जणांचे उमेदवार अर्ज अवैध

शनिवारी सकाळी मगरीची वैद्यकीय तपासणी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केल्या नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्ण वाढ झालेल्या, ४ वर्षाच्या मादी मगरीला वरीष्ठ कार्यालयाची पूर्व परवानगी घेत निसर्गात मुक्त करण्यात आले.

समडोळी गावा जवळील जुन्या खाणीत एक मगर बरेच दिवस मुक्कामी होती. खाणीत भर टाकून ती भरून घेण्याचे तसेच कचरा साफ करण्याचे काम चालू होते त्याच कारणाने ही मगर नागरी वस्तीत आली असावी असा अंदाज आहे.

हेही वाचा…धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उमेदवारी अर्जावरील हरकत फेटाळली, प्रणिती शिंदे व सातपुतेंच्या अर्जांनाही हरकती

या मगरीच्या बचाव कामात समडोळी गावातील नागरिक तसेच उप सरपंच पिंटू मसाले, कोळी यांचे सहकार्य लाभले. वन विभागाचे वन क्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर, वनपाल तुषार भोरे, वनरक्षक सागर थोरवत इतर वन कर्मचारी यांनी ही कारवाई पूर्ण केली.