काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये १५ वर्षे सत्तेत एकत्र राहिल्यानंतर भांडणे झाली. पण सेना-भाजपमध्ये सत्तेत येऊन १५ दिवस झाल्यानंतरच भांडणे सुरू झाली असून राज्यासाठी हे चांगले लक्षण नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आ. छगन भुजबळ यांनी युतीमध्ये सुरू असलेल्या वाक् युध्दावरून बोचरी टीका केली. नदी जोड प्रकल्पांच्या पाणी वाटपात गुजरातला झुकते माप दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
गुजरातचे सरकार पाणी मिळविण्यासाठी धडपड करू शकते तर महाराष्ट्र सरकार का कमी पडत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या मुद्यावर राज्यातील सर्वपक्षीयांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘युतीत १५ दिवसांमध्येच संघर्ष’
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये १५ वर्षे सत्तेत एकत्र राहिल्यानंतर भांडणे झाली. पण सेना-भाजपमध्ये सत्तेत येऊन १५ दिवस झाल्यानंतरच भांडणे सुरू झाली असून राज्यासाठी हे चांगले लक्षण नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आ. छगन भुजबळ यांनी युतीमध्ये सुरू असलेल्या वाक् युध्दावरून बोचरी टीका केली.
First published on: 25-01-2015 at 05:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash in shiv sena bjp alliance within fifteen days chhagan bhujbal