मी पंकजा गोपीनाथ मुंडे असल्याने, मला सहज काही मिळणार नाही. सहज मिळाले ते जनतेचे प्रेमच, त्यामुळे राज्यात सत्तापरिवर्तन करण्यासाठी ‘सिंदखेड राजा ते चौंडी’ अशी संघर्ष यात्रा काढणार असल्याची घोषणा भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे यांनी केली. मागील दीड महिन्यांपासून मला पाहून लोकांच्या डोळय़ांत अश्रू येतात. हे अश्रू म्हणजेच स्व. मुंडे यांची ताकद, असेही त्या म्हणाल्या.
    बीड येथे रविवारी शिवसंग्रामच्या वतीने मराठा आरक्षण मिळाल्यामुळे आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आभार मेळावा झाला. या वेळी आरक्षणासाठी संघर्ष करणारे आमदार विनायक मेटे यांचा सत्कारही करण्यात आला. आमदार बदामराव पंडित, तानाजीराव िशदे, माजी आमदार राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदी प्रमुख उपस्थित होते. मुंडे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांच्या वारस आ. पंकजा मुंडे जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहिल्या. या वेळी त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीचा उमेदवारीअर्ज भरला त्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर या सभागृहात शेवटचे भाषण झाले होते. त्यांच्या निधनानंतर मागील महिनाभरात मी ठरवले होते, रडणार नाही तर लढणार. मात्र, ते म्हणणे इतके सोपे नसते. मागील काही दिवसांत मी स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. कारण लोकांसमोर जाण्याची िहमत होत नव्हती. मात्र असे बसून राहणे स्व. मुंडेंना आवडणार नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, त्या दिवशी अर्धवट राहिलेला त्यांचा दौरा पूर्ण करून मी आता सक्रिय झाले आहे. नाशिकहून येताना गावागावांतील लोक रस्त्यावर आले. सकाळीही बीडपर्यंत येताना लोक रस्त्यावर येऊन आक्रोश करत होते. मला पाहून सर्वसामान्य माणसाच्या डोळय़ांत अश्रू येतात, ही खरी वडिलांची ताकद होती. सर्व जातिधर्माच्या पलीकडे जाऊन मुंडे यांनी उपेक्षित शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. मराठा आरक्षणाला जाहीर पािठबा दिल्याने सरकारनेही निर्णय घेतला. भविष्यात मला मंत्रिपद मिळेल का, हे माहीत नाही. मात्र, मी गोपीनाथ मुंडे यांची मुलगी असल्यामुळे मला सहज काही मिळणार नाही, सहज मिळाले ते जनतेचे प्रेम. त्यामुळे या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी मी माझे उर्वरित आयुष्य कामी लावणार. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिंदखेड राजा ते चौंडी यात्रा करण्याची घोषणाही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा