पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यात खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कर्यकर्त्यांसह समोरासमोर आले. उदयनराजे समर्थकांनी भूमीपूजनाचा कार्यक्रमच उधळून लावला. यामुळे तणावाचे वातावरण झाले. दोन्ही गटांनी जागेवर दावा केला. यामुळे दोन्ही राजेंमधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> मुंबईत १५ ठिकाणी ईडीचे छापे; करोना केंद्र कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरण

आज सकाळी दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचा भूमिपूजन होणार होतं, मात्र नऊ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक या ठिकाणी कार्यकर्त्यांसमवेत भेट देत हे भूमिपूजन उधळून लावले आहे. या ठिकाणी असलेलं साहित्य फेकून दिले आहे, तर कंटेनर पलटी केला. त्यामुळे दोन्ही राजेंमधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच गडबडीत शिवेंद्रसिंहराजे यांनी भूमिपूजन उरकण्याचा प्रयत्न केला. यावेळी तणाव निर्माण झाला. त्यामुळे उदयनराजे सामर्थक कार्यकर्ते खवळले. त्यांनी साहित्याची मोडतोड केली. या जागेवर आणण्यात आलेला कंटेनर उलटून टाकला. पोलिसांनी दोन्ही बाजूना शांत करण्याचा प्रयत्न केला.

खिंडवाडीतील बाजार समितीच्या जागेचा वाद चिघळला. खा. उदयनराजे व आ.शिवेंद्रराजे आमने-सामने आले. दोन्ही राजेंचे समर्थक समोरा-समोर आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी दोन्ही राजांना कार्यकर्त्यांसह तेथून जायला सांगितले. सध्या परिसरात तणावपूर्ण पण शांतता आहे. आजच साताऱ्यात कराड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन दिवसाच्या दौरा आहे. त्यापूर्वीच्या दोघांमध्ये वाद झाल्याने यावर देवेंद्र फडणवीस काय उपाययोजना करणार याकडे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clashed between udayan raje and shivendra singh raje in satara during the groundbreaking ceremony of the new building of bazar samiti sgk