लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात सोमवारी आजी व माजी खासदारांमध्ये शहरातील विकासकामांच्या श्रेयावरून जोरदार खडाजंगी झाली. यावेळी काही कार्यकर्ते खासदार विशाल पाटील यांच्याकडे धावून जाण्याचा प्रकारही पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या साक्षीने घडला. तासगाव नगरपालिकेसाठी १३ कोटी रुपयांचा खर्च करून अद्ययावत इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे आज पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

यावेळी बोलताना खा. पाटील यांनी तासगावच्या बाह्यवळण रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १७३ कोटींचा निधी मंजूर केल्याचे सांगितले. हा निधी स्थानिक आमदारांच्या पाठपुराव्याने मंजूर करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले असल्याचा उल्लेख खासदारांनी आपल्या भाषणात केला. यानंतर भाषणास उभारलेल्या माजी खासदार पाटील यांनी खासदारांच्या उल्लेखाला जोरदार आक्षेप घेत विकास कामासाठी निधी कसा मंजूर करायचा हे नुकत्याच खासदार झालेल्यांनी सांगू नये असे म्हणताच, खासदार पाटील यांनीही मी सभेचे संकेत पाळत वक्तव्य केले असून जे गडकरी यांनी सांगितले त्याचाच उल्लेख केला असल्याचे सांगत माजी खासदारांचा आक्षेप फेटाळून लावण्यासाठी ते उभे राहिले. यामुळे वाद उफाळून आला. दोघेही एकमेकांकडे हातवारे करत इशारे देत असल्याचे पाहताच सभागृहात उपस्थित असलेले कार्यकर्तेही व्यासपीठावर धावले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत खासदार पाटील यांच्याभोवती संरक्षण कडे केले.

आणखी वाचा-धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

दरम्यान, तासगावच्या बाह्यवळण रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी निधी मंजुरीची घोषणा केल्यानंतर तासगावमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात गडकरींचे अभिनंदन करणारे फलक लावले होते. यावरून हा श्रेयवाद धुमसत होता. आज नगरपालिका इमारत उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी खा. पाटील यांनी उल्लेख करताच हा श्रेयवाद उफाळून आला

असाच प्रकार रविवारी जतमध्ये भाजपच्या बूथ कमिटीच्या बैठकीत घडला. पक्ष निरीक्षकासमोर प्रचारप्रमुख तमणगोंडा रवी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपने स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी असे सांगताच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला. यावरून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.