कर्जत : शहराला स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी गेल्या एक हजार ५८५ दिवसापासून रोज श्रमदान करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या स्वच्छता शिलेदारांनी कर्जत (अहिल्यानगर) पंढरपूरची पाचवी पर्यावरण पूरक सायकल वारी केली. आणि त्या ठिकाणी पोचल्यावर चंद्रभागेच्या काठावर दीड तास श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झाडे लावा, झाडे जगवा,झाडे वाचवा तसेच स्वच्छता करा,स्वच्छता राखा अशा प्रकारचा संदेश देत ही पर्यावरण जनजागृती सायकल वारी सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार पाच वर्षापासून करित आहेत. यात रस्त्याने लागणाऱ्या गावात ठिकठिकाणी पर्यावरण विषयीची जनजागृती घडावी या उद्देशाने ही सायकलवारी चालू आहे.

श्री संत गोदड महाराज मंदिरापासून निघालेली ही वारी करमाळा,जेऊर कारखाना, टेंभुर्णी, करकम या ठिकाणचे ठेपे घेत घेत चंद्रभागेत पोहोचली. त्या ठिकाणी या सर्व शिलेदारांनी चंद्रभागेत दीड तास श्रमदान करुन स्वच्छता मोहीम राबवली. त्याचबरोबर तेथील प्रशासन, येणाऱ्या भक्तजनांना चंद्रभागा स्वच्छ करण्याचे व ठेवण्याचे आवाहनही यावेळी शिलेदारांनी केले. या सायकल वारीत १६ सायकल स्वारांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर इतर वाहनांमधून गेलेले शिलेदारही या स्वच्छते मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी पंढरपूर नगरपालिकेने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीचे उपलब्ता करुन तसेच मोठ्या गोण्या देऊन सहकार्य केले.

या पर्यावरण पूरक सायकलवारी करमाळा येथे प्राध्यापक राख सर यांनी या संघटनेचे विशेष कौतुक केले व आम्हीही याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच करकम या ठिकाणी लेकीचे झाड अभियान राबवनारे दुधाने सर व तेथील टीमने शिलेदारांचे ने स्वागत केले तसेच सर्व सामाजिक संघटनेच्या सर्व शिलेदारांना छान बाजार आमटीच्या स्वादिष्ट भोजनाचे नियोजन करकम येथील निळकंठ ढोबळे यांनी केले होते.

अखंडित चालू असलेल्या श्रमदानाचे विशेष कौतुक या ठिकाणी करण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा, स्वच्छता करा, स्वच्छता ठेवा असा संदेश देत देत ही मंडळी गेल्या साडेचार वर्षांपासून अविरतपणे श्रमदान करीत आहे. आत्तापर्यंत कर्जत शहर व परिसरात स्वच्छतेबरोबरच एक लाखापेक्षा जास्त झाडे लावून ती जगण्याची मोठं काम ही सर्व समाजिक संघटना व तिचे शिलेदार करीत आहेत.