वाई: ‘आमचे किल्ले आमची जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत सातारा पोलिसांनी किल्ले अजिंक्यतारा स्वच्छता मोहीम सुरू करत आज एका अनोख्या उपक्रमास सुरुवात केली. पोलीस अधीक्षक  समीर शेख यांनी स्वत: सहभाग नोंदवत स्वच्छता मोहिमेस  सुरुवात केली. त्यांनी नागरिकांना, विद्यार्थ्यांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

प्रथमच सातारा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून  मकरसंक्रांतीच्या दिवशी किल्ले अजिंक्यताऱ्यावरून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत साताऱ्यातील सामाजिक संघटनांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. दरम्यान, दोन तासामध्ये गडावरील राजसदर, राजवाडा, गडाचा मुख्य दरवाजा, टेहळणी बुरुज, दगडी घाणा आणि मुख्य महल परिसराची स्वच्छता करण्यात आली. वाढलेले गवत काढण्यात आले. झाडांना आळे करण्यात आले. प्लास्टिकचे कागद पाण्याच्या मोकळय़ा बाटल्या गोळा करण्यात आले.

bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Municipal administration to clean 23 ponds in Thane
ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ
Even 25 percent of work of Jal Jeevan Mission scheme in district is incomplete says bhaskar jadhav
जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे कोट्यावधी रुपये पाण्यात- आमदार भास्कर जाधव
pcmc health department to take punitive action if found garbage thrown in openly
कचरामुक्त पिंपरी-चिंचवडसाठी पुढाकार; आठ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांवर लक्ष
Drought of Funds , Micro Irrigation Scheme,
सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील पावणेदोन लाखहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित
Kalyan, Water scarcity of 27 villages, Amrit Yojana,
कल्याण : २७ गावांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य संपणार, अमृत योजनेमुळे २७ गावांमध्ये १०५ दलघमी पाण्याची साठवण
maharashtra first chief minister medical assistance cell opens in panvel
राज्यातील पहिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पनवेलमध्ये सुरू

जमा कचरा गडावरून खाली आणण्यात आला. त्याचे योग्य पद्धतीने पालिकेच्या कचरा डेपोत निर्मूलन करण्यात आले. दरम्यान मोहिमेच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये मंगळाई मंदिर परिसरात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना इतिहासतज्ज्ञांच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले. रविवारी सकाळी  सातारा पोलीस दलाचे सुमारे अडीचशे कर्मचारी खालच्या मंगळाई मंदिराच्या जवळ जमले. तेथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सूचना दिल्या. सहभागी झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यास हातमोजे व लागणारे साहित्य दिले. गडाच्या प्रवेशद्वारापासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.

जिह्यात पंचवीसपेक्षा जास्त लहान मोठे किल्ले आहेत. काही किल्ले टेहळणी बुरुज म्हणून प्रसिद्ध आहेत. या गडकिल्यावर गडसंवर्धन संस्था काम करत असतात. सर्वाच्या सहकार्याने गडकिल्ल्याचे संवर्धन करायचे आहे. गडकिल्ले हे आपले प्रेरणा स्रोत आहेत. सर्व किल्ल्यांवर दर रविवारी अशी मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये मी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गडकिल्ल्यांची तेथील प्रभारी अधिकारी, कर्मचारी सहभाग नोंदवतील. नागरिकांना याबाबत आवाहन करण्यात आले होते. मोठय़ा संख्येने यामध्ये नागरी सहभागही आढळून आला. आजचे काम झाल्यावर अजिंक्यताऱ्यावर शाहिरी पोवाडय़ाचा कार्यक्रम झाला. याबाबत मी महसूल प्रशासनाला आवाहन  करणार आहे. सर्वाच्या सहकार्याने गडकिल्ल्यांवर ही मोहीम सुरूच राहणार आहे.

– समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा

Story img Loader