तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये उद्या (दि. ७ रोजी) चुरशीच्या लढती होणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आदींचे भवितव्य उद्याच्या मतदानातून ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रथमच छत्रपती घराण्यातील उमेदवारी असल्याने त्याविषयी राज्यभरात आकर्षण आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रीमंत शाहू महाराज हे निवडणूक रिंगणात असून त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आव्हान दिले आहे. छत्रपती – मंडलिक घराण्यातील हा दुसरा सामना आहे. यापूर्वी २००९ मध्ये दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज संभाजी राजे छत्रपती यांचा पराभव केला होता. या यावेळच्या निवडणूकमध्ये मंडलिक यांनी पुन्हा एकदा गादी , वारसदार असे वादग्रस्त मुद्दे उपस्थित केले. खेरीज, धुळ्याचे भाजपचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना खास पाचारण करून या वादाला धग दिल्याने हा विषय गाजत राहिला. महाविकास आघाडीच्या वतीने संजय मंडलिक यांना निष्क्रियता, कामाचा अभाव या मुद्द्यांवरून चांगलेच घेरले आहे. त्यांचा मंडलिक साखर कारखाना नुकसानीत असल्याचा मुद्दा चव्हाट्यावर आणल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या.
रायगड
रायगड मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात होत आहे. मतदारसंघात एकूण १६ लाख ६८ हजार ३७२ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ८ लाख २० हजार ६०५ आणि महिला मतदार ८ लाख ४७ हजार ७६३ आहेत. मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे.
सातारा
गेली २५ वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला सातारा मतदारसंघ यंदा शरद पवार यांना साथ देतो का याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. महायुतीतील भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. पोटनिवडणुकीत उदयनराजे पराभूत झाले होते. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली असली तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही.
हेही वाचा >>> फडणवीस यांची शिष्टाई; नाईक यांची नाराजी दूर
माढा
बारामतीप्रमाणे राज्यात चर्चेत राहिलेल्या माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर, बसपाचे स्वरूप जानकर, अपक्ष प्रा. लक्ष्मण हाके आदी एकूण ३२ उमेदवार आहेत. मतदारसंघात महामार्गाची कामे. पाणी प्रश्न, रेल्वे मार्ग, औद्याोगिक वसाहतींच्या प्रश्नांसह जातींची समीकरणे महत्त्वाची मानली जातात. माढ्यात एकूण १९ लाख ९१ हजार ४५४ मतदार आहेत.
हातकणंगले
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर या तिघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. माने यांच्या विषयी मतदारसंघात नाराजी होती. इचलकरंजीचा पाणी आणि वस्त्र उद्याोग या प्रश्नाने राजू शेट्टी यांना अडचणीत आणले होते. त्यातून त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा मतदारसंघात आले. सत्यजीत पाटील सरूडकर यांच्या मागे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ताकद लागली असल्याने त्यांनी नंतरच्या काळात चांगली झेप घेतली आहे. शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे पाठबळ घेऊन राजू शेट्टी स्वबळावर नशीब अजमावत आहेत. माने यांच्या आधीचे तीन खासदार सलग दोनदा निवडून आले होते.
लातूर
लातूर मतदारसंघात भाजपचे खासदार सुधाकर शाृंगारे यांच्याविरोधात काँग्रेसने शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने गेल्या दोन निवडणुकीत विजय मिळवला आहे. या मतदारसंघात प्रचारादरम्यान राष्ट्रीय मुद्देच प्रभावी ठरले आहेत. काँग्रेसचा उमेदवार माला जंगम समुदायातील असल्याने लिंगायत समाजाच्या मतांवर त्यांची भिस्त आहे. भाजप उमेदवार विकासकामांच्या आधारे मते मागत आहेत तसेच मोदींचा करिष्मा कितपत चालतो याबाबत उत्सुकता आहे.
सोलापूर
काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या सलग दोनवेळा झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांची कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात येथे लढत होत आहे. ही लढत माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी विरुद्ध ऊसतोडणी मजुराचा मुलगा अशी चर्चेत आली आहे. भाजपकडून विकासावर भर दिला जात असताना काँग्रेसकडून रखडलेल्या विकासाकडे बोट दाखवले जात आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, मोदी सरकारने केलेल्या विकासकामांचे मुद्दे पुढे केले जात आहेत. सोलापुरातील विविध जात समूह देखील या निवडणुकीत महत्त्वाचे घटक ठरणार आहेत.
उस्मानाबाद
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांनी आव्हान दिले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर बहुतांशी नेते ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेला हा जिल्हा. महायुतीकडे जिल्ह्यातील सर्व नेते झुकलेले आहेत. अलीकडेच बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांशी संपर्क असणारे ओमराजे निंबाळकर यांच्याबरोबर उस्मानाबाद विधानसभेचे आमदार कैलास पाटील हे साथ देत आहेत. वरकरणी मतदारसंघात नवी बांधणी दिसत असली तरी लढा मात्र पारंपरिकच आहे.