अलिबाग: किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते.

आणखी वाचा-सांगली : सेल्फी घेताना नदीत पडून तरुण बेपत्ता

kalyan durgadi fort Govindwadi bypass road close until Dussehra due to navratri festivals
दुर्गाडी किल्ला येथील जत्रोत्सवामुळे कल्याणमधील गोविंदवाडी वळण रस्ता वाहतुकीसाठी बंद
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
thieves broke sweet shop lock and stole cash and two and a half kilos mango barfi
पुणे : चोरट्यांचा आंबा बर्फीवर ताव; मिठाई विक्री दुकानातून रोकड, अडीच किलो आंबा बर्फी चोरीस
nar madi waterfall in the historical Naladurg Bhuikot Fort is start
ऐतिहासिक नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील नर-मादी धबधबा सुरु
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात
Chandrapur Sudhir mungantiwar marathi news
नागपूर : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री म्हणतात, “उपाययोजना…”
What alternative routes are available for transportation during the Girgaon Ganesh Visarjan procession Mumbai news
गिरगावात मिरवणूक बघायला जाताय,या रस्त्यांवर प्रवास टाळा
young man visiting Srikshetra Olandeshwar swept away in Panganga River found dead after 20 hours
बुलढाणा : महादेवाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण पैनगंगेत बुडाला; तब्बल २० तासांनंतर…

तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते. अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वहात्या पाण्यात आडकून पडले. त्यातील एका पर्यटकाने रायगडवरील ढग फुटीचे मोबाईल चित्रिकरण केले. ते व्हायरल झाले आहे.

दरम्यान पावसाचे स्वरुप लक्षात घेता ८ जुलै पासून म्हणजेच आजपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे.रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे, यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. रोप वे प्रशासनाकडून