राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नेमणुकीबाबत महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना १ सप्टेंबरला भेटणार आहेत. पुण्यातील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. ८ महिने होऊनही राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीवर काही निर्णय घेतला नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती राज्यपालांना भेटून केली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर पत्रकार परिषदेत माहिती दिली. “मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती.सगळ्यांच म्हणणं ऐकून घेतलं. सगळ्यांचं मत आहे की, ओबीसी आरक्षणबाबत निंर्णय होत नाही. तोपर्यंत निवडणुका घेऊ नये असं सर्वपक्षीय नेत्यांचं मत आहे.,”असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवरही भाष्य केलं. नारायण राणेंवर झालेल्या कारवाईबाबत त्यांनी आपलं मत मांडलं. “पोलिसांनी लगेच कोणती कारवाई केली नव्हती. त्यांचे काही लोकं कोर्टात गेलं आणि कोर्टानं नाकारलं. हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. ते झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या.”प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या चौघांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग आहे. प्रत्येकाने जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हे प्रसंग आले नसते.”, असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अजित पवार यांनी सांगितलं. “सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. काम पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं”, असं टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणला.

Story img Loader