कोल्हापूर : नांदणीमधील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला तीर्थक्षेत्र अ दर्जा देवून आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.
मठातील पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, काल नागपूर येथे जैन ट्रेड ऑर्गनायझेशन कार्यक्रमात जैन समाजातील वेगळे स्वरूप पाहता आले. आज पुन्हा याच समाजाचे दुसरे स्वरूप पाहायला मिळाले. जैन समाजात व्यवसाय आणि व्यापारात देशासाठी योगदान देणारे लोक आहेत. ते काल नागपूर येथे भेटले. आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी लोक भेटले.
हेही वाचा…‘अलमट्टी’ची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा विरोध, फडणवीस (प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात)
यावेळी जैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराज, मठाधिपती, १० आचार्य महाराज, ७ मुनी महाराज, मंत्री वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे, अमल महाडिक, अशोक माने, शिवाजी पाटील, सुरेश खाडे आदी आमदार, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.देशातील पहिले जैन महामंडळ राज्यात स्थापन केले गेले. ते अधिक बळकट करून प्रत्येक युवकाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.