गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात मुख्यमंत्री वा इतर खात्याच्या मंत्र्यांचा दावोस दौरा हा राजकीय चर्चेचा मुद्दा ठरला आहे. दावोसला झालेल्या बैठकांमधून राज्यात किती गुंतवणुकीचा करार झाले, याचे आकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून सातत्याने मांडले जातात. आता राज्यात सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असताना सत्ताधाऱ्यांकडून राज्यासाठी भरघोस गुंतवणुकीचे करार झाल्याचं सांगितलं जात आहे. पण करार होणं आणि प्रत्यक्षात गुंतवणूक होणं, यातलं अंतर कापलं जाणं हे जास्त महत्त्वाचं असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण…
“महाराष्ट्रात गुंतवणूक करणं महाग झालं आहे”, असं म्हणत गिरीश कुबेर यांनी दावोस दौऱ्यातलं यश हे प्रत्यक्षात राज्यात किती गुंतवणूक होते, यावर अवलंबून असल्याचं नमूद केलं आहे.