Devendra Fadnavis On Mahayuti Cabinet: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर गुरुवारी (५ डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे. यातच भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मात्र, गृहमंत्री पद शिंदेंना देण्यास भाजपाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. या चर्चांवर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपा आणि शिंदे गटात गृहमंत्रिपदावरून खरंच रस्सीखेच सुरु आहे का? यावर बोलताना सर्व चर्चा देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्या. “भाजपा आणि शिवसेनेत गृहमंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नाही. पण त्यावर आमची चर्चा सुरु होती”, असंही फडणवीसांनी म्हटलं. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा