Will Raj Thackeray Join Hands With Mahayuti: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत मोठी चर्चा पाहायला मिळाली. त्याबाबत खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा सकारात्मक विधानंही केली होती. काही ठिकाणी तर त्यांनी निकालांनंतर आमच्या पाठिंब्यावरच महायुतीचं सरकार स्थापन होईल, असाही दावा केला होता. पण विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार जिंकून येऊ शकला नाही. त्यांचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही पराभव झाला. त्यामुळे मनसेचं आता काय होणार? अशी चर्चा सर्वत्र सुरू झालेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय लागले विधानसभेचे निकाल?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यंदाच्या निवडणुकीत जवळपास १२८ उमेदवार उभे होते. त्यात खुद्द राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हेदेखील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. पण त्यांनाही विजय मिळवण्यात अपयश आलं. मात्र, काही मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना मोठ्या प्रमाणवार मतं मिळाल्याचंही दिसून आलं. त्यामुळे काही मतदारसंघांत तरी मनसेच्या उमेदवारामुळे निकाल वेगळे लागल्याचा अंदाज आकडेवारीवरून लावला जात आहे.

राज ठाकरेंनी केलं अभिनंदन!

दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. “२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो”, असं या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

MNS Candidates Result: मनसेच्या उमेदवारांना कुठे किती मतं मिळाली? वाचा संपूर्ण १२८ उमेदवारांची यादी; अमित ठाकरे ‘इतक्या’ मतांनिशी तिसऱ्या स्थानी!

दरम्यान, या सर्व घडामोडी चालू असताना राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सूचक भाष्य केलं आहे.

लोकसभेत आम्हाला राज ठाकरेंचा फायदा झाला – देवेंद्र फडणवीस

“मुळात लोकसभेत त्यांनी आम्हाला खुल्या दिलानं पाठिंबा दिला होता. आम्हाला त्याचा फायदा देखील झाला. विधानसभेत आमच्या हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे. त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज ठाकरेंची अभिनंदनपर पोस्ट…
आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो. पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की… मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा ! राज ठाकरे.

“इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले. पण त्यांना मतं चांगली मिळाली आहेत. त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत. मला वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आलं तर आम्ही प्रयत्न करू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे मुंबई महानगर पालिका निवडणुकांसाठी महायुतीमध्ये जाणार का? यावर चर्चेला सुरुवात झाली आहे.

Devendra Fadnavis on EVM: ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी देशमुख बंधूंच्या निकालाकडे दाखविले बोट; म्हणाले, “लातूरमध्ये…”

पालिका निवडणुकांचं काय होणार?

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती आणल्यामुळे महाराष्ट्रात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत गेल्या तीन वर्षांपासून अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यासंदर्भातही देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत भाष्य केलं. “एका दृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण अडकलं आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे. मी कालच सरकारी वकिलांशी बोललो की त्याची सुनावणी लवकर घ्यावी यासाठी अर्ज करा आणि न्यायालयाला विनंती करा की याबाबतची स्थगिती हटवा. आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजेत”, असं ते म्हणाले.